Pooja Sawant Engagement : ग्लॅमरस अभिनेत्री पूजा सावंत सध्या एका विशेष कारणामुळे चर्चेत आली आहे. मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत हिने चाहत्यांसह एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. लवकरच पूजा विवाहबंधनात अडकणार आहे. ‘आमचं ठरलं’ म्हणत पूजाने तिच्या होणाऱ्या पतीबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. पूजा सावंतने नुकताच तिचा साखरपुडा केला असल्याची गुडन्यूज सोशल मीडियावरून शेअर केली आहे.
पूजाने ही आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली तेव्हापासून सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे लागून राहिल्या आहेत. कारण अभिनेत्रीने तिच्या होणाऱ्या पतीबरोबरचे पाठमोरे फोटोस शेअर करत रिंग फ्लॉन्ट केली. त्यामुळे नेमकी पूजा कोणाला डेट करतेय हे जाणून घेणं चाहत्यांना उत्सुकतेचं राहिलं. याआधी पूजा सावंतचं नाव अनेक अभिनेत्यांसह जोडलं गेलं मात्र आता या चर्चांना अभिनेत्रीने पूर्णविराम दिला आहे.
पूजाने तिच्या होणाऱ्या जोडीदाराबरोबरचा फोटो सोशल मीडियावरून शेअर केला आहे. कालपासून गुलदस्त्यात असलेली ही व्यक्ती नेमकी कोण आहे, असा प्रश्न साऱ्यांना पडला होता. त्या व्यक्तीचं नाव व चेहरा समोर आला आहे. सिद्धेश चव्हाण असे अभिनेत्रीच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव आहे. पूजाने सिद्धेशबरोबर रोमँटिक पोज देत फोटो शेअर केले आहेत. या फोटोखाली कॅप्शन देता पूजाने लिहिलं आहे की, “प्रेम व वचनबद्धतेचा हा नवीन अध्याय तुमच्यासह शेअर करण्यास उत्सुक आहे. सिद्धेश चव्हाणसह प्रेमात गुंतले आहे” असं म्हणत तिने हे फोटो शेअर केले आहेत.
पूजा व सिद्धेशच्या फोटोंनी सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. दोघांनी एकमेकांना मिठीत घेतलेलं रोमँटिक फोटो साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. पूजाच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक कलाकार मंडळींनी पूजाच्या पोस्टवर कमेंट करत तीच अभिनंदन केलं आहे. तर काही चाहत्यांनी ‘लक्ष्मीनारायणाचा जोडा’, ‘मिस्टर व मिसेस कलरफुल’ अशा कमेंट केल्या आहेत. एका चाहतीने गमतीत ‘चिकणा आहे गं, दोघांचेही अभिनंदन’ अशी कमेंट केली आहे.