स्टार प्रवाह वरील मालिकांच्या लिस्ट मधील सहकुटुंब सहपरिवार ही मालिका कुटुंबातील एकटा कशी असावी याबद्दल प्रेक्षकांना प्रोत्साहित करत असते तर कुटुंबातील चढउतारांबाबत देखील पदाखवण्यात येते. या मालिकेतील सगळीच पात्र प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. ३ जोड्यांच्या या कुटुंबातील पशा आणि अंजी ही जोडी प्रेक्षकांना विशेष आकर्षित करते. सध्या मालिकेत जरी पशा अंजी मध्ये दुरावा असला तरीही खऱ्या आयुष्यात पशाची म्हणजेच आकाशची लग्न पत्रिका छापून तयार झालीये.(Akash Nalawade wedding)
रुचिका धुरी असे आकाशच्या होणाऱ्या पत्नीचे नाव असून त्यांचा साखरपुडा गेल्यावर्षी पार पडला होता. आता या वर्षी ते दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत. त्याची होणारी पत्नी रुचिका हिने सुद्धा तिच्या इंस्टावर पत्रिकेची स्टोरी शेअर केली आहे. याचबरोबर आकाशच्या अनेक चाहत्यांनी सुद्धा स्टोरी शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. म्हणजे आता आकाश ला त्याच्या खऱ्या आयुष्यातील अंजी भेटली आहे असं म्हणायला हरकत नाही.

आकाशच्या सहकुटुंब सहपरिवार या मालिकेतील भूमिकेतला त्याचा निरागसपणा, वागण्या बोलण्याची गावरान पद्धत आणि अंजी-पश्याचं प्रेम प्रेक्षकांना फार आवडत आहे. त्याच्या अभिनय कौशल्यामुळे फार कमी वेळातच त्याची भूमिका लोकप्रिय झाली. आकाश नलावडे सोशल मीडियावरदेखील प्रचंड सक्रीय असतो. मालिकेतील कलाकारांसोबत तो भन्नाट रील्स शेअर करत असतो. त्याला यामध्ये अंजी देखील साथ देत असते. लग्नाची तारीख अजून समोर आली नसून. पण पत्रिका समोर आल्याने त्यांचं लग्न लवकरच असणार असा अंदाज वर्तवला जात आहे.(Akash Nalawade wedding)
=====
हे देखील वाचा- ‘या’ कलाकाराला हास्य जत्रेत परत येण्याची प्रेक्षकांची मागणी
=====
सध्या मनोरंजन सृष्टीत लगीनघाई सुरु आहे. मराठी विश्वात राणा दा आणि अंजली बाई म्हणून प्रसिद्ध असणारे हार्दिक जोशी बाबी अक्षय देवधर यांचं लग्न धुमधाक्यात पार पडल्या नंतर नव्या वर्षाच्या सुरुवातीला विनोदी अभिनेत्री वनिता खरात हिने सुमित लोंढे याच्याशी लग्नगाठ बांधली. काही दिवसांपूर्वी ‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील अभिनेत्याने लग्नगाठ बांधली होती. तर आता आकाश नलावडे लग्न बंधनात अडकणार आहे. पश्याची आणि त्याच्या रिअल लाईफ मधल्या अंजीची ही जोडी खऱ्या आयुष्यातील जोडी पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे दिसून येत आहेत.