वादग्रस्त हिंदी रिॲलिटी शो ‘बिग बॉस १७’ सध्या बरंच गाजत आहे. बॉलिवूड स्टार सलमान खान या शोचं होस्ट करत असून हा शो अनेक कारणांमुळे चर्चेत आला आहे. शोच्या पहिल्याच दिवसांपासून स्पर्धकांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणांवरून जोरदार वाद होत असल्याचं चित्र दिसत आहे. त्यामध्ये अंकिता लोखंडे-विकी जैन आणि नील भट्ट-ऐश्वर्या शर्मा यांच्यात सतत जोरदार भांडणे होत असल्याचं पाहायला मिळतो. आता आणखी काही स्पर्धकांमध्ये एका कारणामुळे जोरदार भांडण झाल्याचं पाहायला मिळालं. (Anurag Dobhal will voluntary exits from Bigg Boss 17)
गेल्या भागात प्रसिद्ध बाईक रायडर अनुराग डोभाल उर्फ बाबू भैय्याचं सनी आर्या (तहलका प्रॅन्क) आणि गेमर अरुण माशेट्टी यांच्याशी कडाक्याचं भांडण झालं. ज्यात त्यांनी एकमेकांच्या खासगी आयुष्यावर बोलले होते. ज्यामुळे अनुराग चांगलाच भडकला आणि त्याने संपूर्ण किचनची तोडफोड केली. ज्याची शिक्षा घरातील अन्य सदस्यांना मिळाली. अशातच अनुरागने हे घर सोडण्याचा निर्णय घेतला असून त्याने ही बाब खुद्द बिग बॉस समोर बोलून दाखवली. सोशल मीडियावर या शोचा एक प्रोमो समोर आला, ज्यामध्ये तो बिग बॉसचं घर सोडण्यामागचं कारण सांगितलं आहे.
हे देखील वाचा – सोनाली कुलकर्णीने दुबईमध्ये खरेदी केलं आलिशान घर, फोटो शेअर करत दाखवली झलक, कसं आहे अभिनेत्रीचं घर?
Anurag Dobhal lena chahthe hai voluntary exit Bigg Boss se ????pic.twitter.com/5Tsp4pg2vN
— #BiggBoss_Tak???? (@BiggBoss_Tak) November 14, 2023
समोर आलेल्या या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात येतं की, गेल्या आठवड्यात बिग बॉसने घरातील सदस्यांचे रूम बदलले होते. त्यांनतर अनुराग डोभाल बिग बॉसचं घर सोडण्याची इच्छा व्यक्त करतो. तेव्हा बिग बॉस त्याला कन्फेशन रूममध्ये बोलावून वॉलंटरी एग्जिट बद्दल त्याच्याशी चर्चा करतो. यावेळी बिग बॉस अनुरागला विचारतो की, ‘तुम्ही तुमच्या इच्छेने हा शोमधून बाहेर पडणार आहात का?’. त्यावर तो म्हणाला, “जर हे असंच सुरु राहिलं, तर मी इथे फार काळ राहू शकणार नाही.” एकूणच, अनुराग हे घर सोडण्याच्या तयारीत असल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
हे देखील वाचा – सलमान खानचा ‘टायगर ३’ पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये तुफान गर्दी, ‘जवान’चाही मोडला रेकॉर्ड, आतापर्यंत कमावले तब्बल इतके कोटी
दरम्यान, मागच्या भागात अनुराग तहलका प्रॅन्क उर्फ सनी आर्याशी वाद झाला. त्यानंतर त्याने अरुण माशेट्टीबरोबर जोरदार भांडण केले होते. ज्यामुळे त्याला राग अनावर झाला आणि घरातील किचनची नासधूस केली. याच कारणांमुळे बिग बॉसने त्याला शिक्षा म्हणून संपूर्ण सीझनसाठी नॉमिनेट केलं आहे. आता पुढील भागात प्रेक्षकांना नेमकं काय पाहायला मिळणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.