विनोदाचं अचूक टायमिंग जुळवत ओंकार भोजनेने कायमच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, या रिऍलिटी शो मधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला विनोदवीर म्हणजे अभिनेता ओंकार भोजने. मात्र जेव्हा पासून ओंकारने हास्यजत्रेतून एक्झिट घेतली तेव्हापासून त्याचे चाहते भोजनेला हास्यजत्रेत मिस करत होते. कॉमेडीचं परफेक्ट टायमिंग आणि ‘अगं अगं आई, बाबा ओरडू ओरडू, मला घाबरू घाबरू..’ या ओंकारच्या संवादाने समस्त प्रेक्षकांना वेड लावले. (Onkar Bhojane In MHJ)
आता ओंकारचे हे संवाद पुन्हा एकदा हास्यजत्रेतून ऐकायला मिळणार असल्याची गोड बातमी समोर आली आहे. कारण लवकरचं हास्यजत्रेतून बाहेर पडलेला ओंकार आता हास्यजत्रेत पुन्हा एंट्री घेण्यास सज्ज झाला आहे. नुकत्याच सोनी मराठी वाहिनीच्या ऑफिशिअल पेजवरून ओंकार हास्यजत्रेत परतल्याचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. “हास्यजत्रेत पुन्हा एकदा ओंकार भोजनेची धमाल”, असं कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
ओंकारच्या स्किटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावरून शेअर करण्यात आला असून अल्पावधीतच या व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे. या व्हिडिओत ओंकार असं बोलताना दिसतोय की, “माझं असंच आहे, मला वाटलं तर मी येतो नाहीतर येत पण नाही”, “एवढ्या माझ्यावर कशाला ओरडताय, कधी नव्हे ते एकदा आलोय तर, सगळंच माझ्यावर देऊ नका” हे त्याचे संवाद ऐकून प्रेक्षक खूप खुश झाले आहेत. अनेकांनी ओंकार परतल्याने आनंद व्यक्त करत कमेंटचा वर्षाव केला आहे.
एका चाहत्याने कमेंट करत म्हटलं आहे की, “वा वा लयभारी आता खरी मजा येणार, खुपच आंनद झाला बघुन” अशी कमेंट केली आहे. तर एका चाहत्याने “आता आला आहे तर परत जाऊ देऊ नका” अशी कमेंट केली आहे. तर एका नेटकऱ्याने, “आता राडा होणार” अशी कमेंट केली आहे. तर अनेकांनी ओंकार परत आल्याने त्याचं अभिनंदन केलं आहे. परफेक्ट,अफलातून अभिनयाने ओंकारने समस्त प्रेक्षक वर्गाला वेड लावले. सर्वांना हसविण्यात तरबेज असलेला ओंकार मालिकाविश्वातून बाहेर येत सिनेविश्व आणि नाटकविश्वाकडे वळला होता. आता पुन्हा एकदा त्याने मालिकाविश्वात पदार्पण केलं आहे.