शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : ‘त्या’ आक्षेपार्ह व्हिडीओबाबत अखेर रश्मिका मंदानाने सोडलं मौन, म्हणाली, “धक्कादायक गोष्ट…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 6, 2023 | 5:37 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Rashmika Mandanna On Viral Video

Video : 'त्या' आक्षेपार्ह व्हिडीओबाबत अखेर रश्मिका मंदानाने सोडलं मौन, म्हणाली, "धक्कादायक गोष्ट…"

अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या एका फेक व्हिडीओने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. हा व्हिडीओ पाहून अभिनेत्रीसह अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. रश्मिका मंदानाचा फेक व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल झाला असून हा तिचा मॉर्फ केलेला व्हिडीओ पाहून यावर अमिताभ बच्चन यांनीही पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय अनेक चाहत्यांनीही हा व्हिडीओ पाहून कारवाईची मागणी केली. या व्हिडीओमध्ये खऱ्या आणि खोट्यातील फरक कळत नाही आहे, त्यामुळे व्हिडीओ पाहताक्षणी हा व्हिडीओ रश्मिकाचा आहे असंच वाटतंय. (Rashmika Mandanna On Viral Video)

या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक मुलगी काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. त्या मुलीचा चेहरा हुबेहुब रश्मिकासारखा आहे. या व्हिडीओमध्ये ती मुलगी लिफ्टमध्ये शिरताना दिसत आहे आणि तिने अतिशय घट्ट व बोल्ड कपडे परिधान केले आहेत. सध्या या व्हिडिओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. अशातच आता अभिनेत्री रश्मिका मंदानाने स्वतः यावर प्रतिक्रिया दिली आहे. तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक नोट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.

आणखी वाचा – Video : रांगोळी, दिव्यांची सजावट अन्…; भावाने केलं अमृता देशमुखचं केळवण, पंचपक्वान न बनवता काय केलं पाहा, व्हिडीओ व्हायरल

रश्मिकाने या व्हिडिओवर नाराजी व्यक्त करत म्हटलं आहे की, “माझा डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे, हे पाहून मला खूप दुःख झालं आहे. याबद्दल बोलणं गरजेचं आहे. हे फक्त माझ्यासाठीच धक्कादायक नाही तर आपणा सर्वांसाठीच धक्कादायक आहे, कारण तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला जात आहे. एक महिला व एक अभिनेत्री म्हणून मी माझे कुटुंब, मित्र आणि शुभचिंतकांचे आभार मानते कारण ते माझे संरक्षक आणि सपोर्ट सिस्टिम आहेत.”

आणखी वाचा – “काशिनाथ घाणेकरांची वाईट नाटकं…”, प्रशांत दामलेंचा फोटो शेअर करत किरण मानेंची पोस्ट, म्हणाले, “भंगार चित्रपटही…”

पुढे रश्मिकाने लिहिलं आहे की, “पण हे मी शाळा किंवा कॉलेजमध्ये असताना घडलं असतं तर मी हे कसं हाताळलं असतं, याची मला कल्पनाही करवत नाही. इतर अनेकजण अशा प्रकरणाला बळी पडण्यापूर्वी आपण याचा एक समाज म्हणून निषेध करायला पाहिजे.” असं म्हणत तिने संताप दर्शविला आहे.

Tags: entertainmentrashmika mandannarashmika mandanna viral videosouth actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
isha malviya parents wants to her out of the show

Bigg Boss 17 : ईशा-समर्थचा ब्लँकेटमध्ये रोमान्स, अभिनेत्रीच्या आई-वडिलांनाच बसला धक्का, म्हणाले, "तिच्या रिलेशनशिपबाबत…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.