शुक्रवार, मे 9, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : रश्मिका मंदानाचा आक्षेपार्ह बोल्ड व्हिडीओ व्हायरल, ‘ते’ पाहून अमिताभ बच्चनही भडकले, कायदेशीर कारवाईची मागणी

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 6, 2023 | 3:02 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Rashmika Mandana Video Viral

Video : रश्मिका मंदानाचा आक्षेपार्ह बोल्ड व्हिडीओ व्हायरल, 'ते' पाहून अमिताभ बच्चनही भडकले, कायदेशीर कारवाईची मागणी

अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या तिच्या आगामी ‘ऍनिमल’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात बॉलिवूड कलाकार रणबीर कपूर आणि बॉबी देओल यांच्यासह तिने स्क्रीन शेअर केली आहे. लवकरचं ‘ऍनिमल’ हा चित्रपट प्रदर्शित होणार असून चाहते त्यांच्या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. येत्या १ डिसेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अशातच अभिनेत्रीच्या एका फेक व्हिडीओने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. हा व्हिडीओ पाहून अभिनेत्रीसह अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. (Rashmika Mandana Video Viral)

रश्मिका मंदानाचा फेक व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल झाला आहे. हा तिचा मॉर्फ केलेला व्हिडीओ पाहून यावर अमिताभ बच्चन यांनीही पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे. व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून अमिताभ बच्चन यांनी कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक मुलगी काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. त्या मुलीचा चेहरा हुबेहुब रश्मिकासारखा आहे. या व्हिडीओमध्ये ती मुलगी लिफ्टमध्ये शिरताना दिसत आहे आणि तिने अतिशय घट्ट व बोल्ड कपडे परिधान केले आहेत.

आणखी वाचा – “अचानक एका बाईंनी मागून अथांगला पकडलं अन्…”, उर्मिला निंबाळकरने सांगितला लेकाबरोबर घडलेला धक्कादायक प्रसंग, म्हणाली, “इच्छेविरुद्ध ओढून त्याचे…”

???? There is an urgent need for a legal and regulatory framework to deal with deepfake in India.

You might have seen this viral video of actress Rashmika Mandanna on Instagram. But wait, this is a deepfake video of Zara Patel.

This thread contains the actual video. (1/3) pic.twitter.com/SidP1Xa4sT

— Abhishek (@AbhishekSay) November 5, 2023

हा बनावट व्हिडीओ अभिषेक नावाच्या एका ट्विटर अकाउंवटरून शेअर केला असून तो एडिटेड असल्याचं समोर आलं आहे. तसेच त्यांनी मुळ व्हिडीओही शेअर केला आहे. या व्हिडीओत दिसणारी मुलगी ही रश्मिका नाही तर झारा पटेल आहे. एआयचे डीपफेक तंत्रज्ञान वापरून रश्मिका मंदानाचा चेहरा झाराच्या त्या व्हिडीओवर लावण्यात आला आणि हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

आणखी वाचा – Video : …अन् नाशिकमध्ये आजीबाईंनी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रभाकर मोरे व चेतना भटचे धुतले पाय, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

yes this is a strong case for legal https://t.co/wHJl7PSYPN

— Amitabh Bachchan (@SrBachchan) November 5, 2023

या व्हिडीओमध्ये खऱ्या आणि खोट्यातील फरक कळत नाही आहे, त्यामुळे व्हिडीओ पाहताक्षणी हा व्हिडीओ रश्मिकाचा आहे असंच वाटतंय. रश्मिकाच्या बनावट व्हायरल व्हिडीओवर चिंता व्यक्त करत अमिताभ बच्चन यांनी लिहिलं आहे की, “कायदेशीर दृष्टिकोनातून हे एक गंभीर प्रकरण आहे.” तसेच चाहतेही या व्हिडीओवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. ‘कोणीही एखाद्याच्या फोटोचा अशा प्रकारे गैरवापर करणं वाईट आहे’, ‘असे व्हिडीओ एडीट करणाऱ्यांवर कारवाई व्हावी’, अशा कमेंट्स करत चाहत्यांनाही संताप दर्शविला आहे.

Tags: amitabh bachchanentertainmentfake videoRashmika Mandana Video Viralrashmika mandannasouth actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

soldier duty over marriage
Social

हळद फिटली नसतानाही जवान लग्नाच्या तिसऱ्या दिवशी कामावर रुजू, आई-वडील भावुक तर पत्नीचा खंबीर पाठिंबा, मन हेलावणारा व्हिडीओ

मे 9, 2025 | 11:22 am
Akshay Kelkar Haldi Ceremony
Entertainment

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला लागली हळद, घरीच कुटुंबियांसह सेलिब्रेशन, मराठी कलाकारांची हजेरी

मे 9, 2025 | 10:56 am
Which Cooking Oil Is Good
Lifestyle

‘या’ तेलामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिकाधिक वाढतंय, जेवणात कोणतं तेल वापरणं अधिक उत्तम?, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार…

मे 8, 2025 | 7:00 pm
Video Viral From Pakistan
Social

“आम्ही भारताला थांबवूच शकलो नाही आणि…”, पाकिस्तान नागरिकाकडूनच भारताचा जयजयकार, पाक सैन्याचं सत्य समोर आणत…

मे 8, 2025 | 4:00 pm
Next Post
Venkatesh and Mahesh Babu playing a poker game viral video

पत्त्यांचा खेळ, टेबलवर पैशांचा ढिग अन्…; महेश बाबू व वेंकटेश यांचा ‘तो’ फोटो व्हायरल, नेटकरीही भडकले

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.