मराठी मनोरंजन विश्वातील अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत ज्यांनी त्यांच्या चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली आहे. काही अभिनेत्री सध्या त्यांच्या मातृत्वाचा आनंद उपभोगत आहेत. सोशल मीडियावरून ते त्यांच्या मातृत्वपणाचा आनंद शेअर करताना दिसत आहेत. अशातच आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीने सोशल मीडियावरून आई होणार असल्याची गुडन्यूज शेअर केली आहे. ‘भागो मोहन प्यारे’ या मराठी मालिकेतील एका अभिनेत्रीने ही गुडन्यूज शेअर केली आहे. या मालिकेतील अभिनेत्री सरिता मेहेंदळेने अलीकडेच ही आनंदाची बातमी दिली आहे. (Sarita Mehendale Pregnant)
सरिताने तिच्या डोहाळे जेवणाचे काही फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावरून शेअर केले आहेत. सरिताने तिचा नवरा सौरभ जोशीबरोबरचे फोटो शेअर करत गरोदर असल्याची गुडन्यूज दिली. त्यांनी शेअर केलेल्या फोटोवरून सरिता व सौरभच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायला मिळतोय. या फोटोंमध्ये सरिता तिचा बेबी बम्प फ्लाँट करताना दिसतेय. पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीने साजरा केलेल्या डोहाळ जेवणाचे फोटो त्यांनी सोशल मीडियावरून शेअर केले आहेत.
फुलांच्या दागिन्यांमध्ये सजलेला सरिताचा लूक खास दिसतोय. सरिता व सौरभसह त्यांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावरचा आनंद ही स्पष्ट दिसत आहे. सरिताच्या डोहाळ जेवणादिवशी सिनेसृष्टीतील काही कलाकार मंडळींनीही हजेरी लावली होती. सरिताच्या डोहाळ जेवणाच्या फोटोंवर सिनेविश्वातील कलाकार मंडळी व चाहत्यांसह अनेकांनी कमेंट करत तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास आजवर तिने अनेक मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ‘भागो मोहन प्यारे’ मालिकेतील मधुवंती ही तिची भूमिका विशेष लोकप्रिय झाली होती. ‘सरस्वती’ या मालिकेतून सरिताने मालिकाविश्वात पदार्पण केलं होतं. काही काळापासून सरिताने सिनेसृष्टीपासून ब्रेक घेतला आहे. तसेच आता सरिताने तिच्या आयुष्यातील खास प्रवासाला सुरुवात केली आहे.