स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही लोकप्रिय मालिकांपैकी एक. २०२० मध्ये सुरु झालेल्या या मालिकेने नुकताच ९०० भागांचा टप्पा गाठला आहे. जयदीप-गौरीची प्रेमळ केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली असून मालिकेतील खलनायिका शालिनीसह अन्य कलाकारांच्या सुंदर अभिनयाने ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत आपले स्थान कायम राखले आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी मालिकेच्या कथानकात एक वळण घेतलं होतं. नुकतंच मालिकेचा नवीन प्रोमो समोर आलं, जे पाहून प्रेक्षक चांगलेच संतापले. (Sukh mhnaje nakki kaay asta new promo)
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचं कथानक आता उत्कंठावर्धक वळणावर आलेलं आहे. लवकरच मालिकेत जयदीप व गौरी यांचा शेवट होणार असल्याचं पाहायला मिळणार आहे. जरी शालिनीचा डाव यशस्वी होणार असला, तरी खऱ्या प्रेमाचा कधीच अंत होत नाही. लवकरच मालिकेत जयदीप-गौरीच्या पुनर्जन्माचा अध्याय सुरु होणार असून कथानक २५ वर्ष पुढे सरकणार आहे.
स्टार प्रवाहच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये मंदार आणि गिरीजा वेगळ्या अंदाजात दिसणार आहेत. मालिका तब्बल २५ वर्षांचा लीप घेणार असून ज्यात जयदीप आणि गौरी यांचा पुनर्जन्म होणार आहे. जयदीप आता अधिराजच्या रूपाने, तर गौरी नित्याच्या रूपाने येणार आहे. प्रोमोच्या सुरुवातीला माई जयदीप-गौरीच्या पुनर्जन्मासाठी अंबाबाईकडे साकडं घालताना दिसत आहे. त्यानंतर जयदीप व गौरी यांचं नवं रूप पाहायला मिळत आहे. प्रोमोमध्ये जयदीप म्हणजेच अधिराज एका रांगड्या गडीच्या अंदाजात शेतात राबताना दिसतो. तर नित्या मॉर्डन अंदाजात दिसली.
हे देखील वाचा – “एवढे वाईट दिवस आले का?”, बोल्ड फोटोशूटवरुन सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री रेशम श्रीवर्धनकर ट्रोल, नेटकरी म्हणाले, “फक्त फेमसाठी…”
दरम्यान, मालिकेचा हा प्रोमो समोर येताच मालिकेच्या कलाकारांसह अन्य कलाकार मंडळींनी कमेंट करत मालिकेला शुभेच्छा दिल्या. असं असलं तरी मालिकेचा हा नवीन प्रोमो प्रेक्षकांना आवडला नाही. सोशल मीडियाद्वारे ते यावर विविध प्रतिक्रिया देत आहे. एक नेटकरी या प्रोमोवर म्हणाला, “अरे यार नको रे यांचा पुनर्जन्म वगैरे. तेच तेच रडगाणं पुन्हा पुन्हा नाही बघायचंय”. तर दुसरा नेटकरी म्हणाला, “हे करण-अर्जुन नाही, तर बाहुबली-देवसेना आहेत.” तर तिसरा नेटकरी यावर म्हणाला, “अरे देवा, ही मालिका आणखी किती वर्ष बोअर करणार” तसेच, अनेकांनी ही मालिका संपली असती, तर बरं झालं असल्याचं यात म्हटलं आहे. एकूणच या मालिकेचा नवा प्रोमो ट्रोल होत आहे.
हे देखील वाचा – ‘रमा राघव’ फेम प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने उरकला साखरपुडा, पारंपरिक लूकने वेधलं लक्ष, फोटो व्हायरल

दरम्यान, मालिकेच्या पुनर्जन्माच्या या कथेत अनेक नवी पात्र भेटीला येणार आहे. २५ वर्षानंतर जयदीप-गौरीच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या शालिनीचं पुढे काय होणार? लक्ष्मी कुठे असेल? नंदिनी शिर्के पाटील कुठे असतील? नित्या-अधिराजची भेट कशी होणार? अशी अनेक उत्तरे यात उलगडणार आहे. येत्या २० नोव्हेंबरपासून ही मालिका रात्री १० वाजता प्रसारित होणार आहे.