शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Aarti Solanki : “तुझा चेक हरवला…”, सततचा अपमान अन् फसवणुकीचा प्रकार समोर आणत आरती सोळंकी स्पष्टच बोलली, म्हणाली, “सगळ्यांचे चेक दिले पण…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 5, 2023 | 9:00 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Aarti Solanki Video

Aarti Solanki : "तुझा चेक हरवला…", सततचा अपमान अन् फसवणुकीचा प्रकार समोर आणत आरती सोळंकी स्पष्टच बोलली, म्हणाली, "सगळ्यांचे चेक दिले पण…"

Aarti Solanki Video : ‘फॅट टू फिट’ जर्नीमुळे बरीच चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणजे आरती सोळंकी. तब्बल ५० किलो वजन कमी करून आरतीने स्वतःला सिद्ध केलं. वजनावरून अपमान करणाऱ्यांची एकप्रकारे आरतीने बोलतीच बंद केली. आजवर आरतीने तिच्या विनोदी अभिनयशैलीने नाटक, मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांची मन जिंकली. मात्र काही कालावधीनंतर आरती सिनेसृष्टीपासून दूर गेली. कारण त्या काळात आरतीला अनेक कठीण प्रसंगांना समोर जावं लागलं.

सिनेसृष्टीत काम करत असताना सततचा अपमान तिला सहन करावा लागावा होता. नुकतीच आरतीने ‘इट्स मज्जा’च्या “मज्जाचा अड्डा” या कार्यक्रमात नुकतीच आरतीने हजेरी लावली होती. यावेळी तिने कामाबरोबरच वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहे. यावेळी बोलताना एक किस्सा सांगत आरती म्हणाली, “सततचा अपमान हा होतंच होता, एका वेळेनंतर माझी सहन करण्याची क्षमता संपली, त्यादरम्यान मला बाहेरून कामही येत होती. तेव्हा माझा एका कार्यक्रमाचा चेक येणार होता. पहिल्या सीझनचा दुसरा अर्धा भाग झाला. सुरुवातीला पहिला सिझन झाला तेव्हा परिस्थिती खूपच वाईट होती. माझी एक मैत्रीण आहे दीपाली गुजराथी म्हणून ती आणि तिचा नवरा असे ते दोघे मला येण्याजाण्याचे पैसे द्यायचे.”

आणखी वाचा – “स्वामी माझ्याकडे आले आणि…”, आरती सोळंकीने अनुभवला दैवी चमत्कार, म्हणाली, “माझी सायकलही स्वामींनीच चालवली अन्…”

आरती पुढे म्हणाली, “त्या कार्यक्रमाचा पहिला सिझन झाला, मग दीड सिझन झाला, त्यावेळेला माझे १४ हजार रुपये येण्याचे बाकी होते. ही २०१०ची गोष्ट आहे. तेव्हा सगळ्यांचे चेक निघाले. आणि सेटवर सगळ्यांचे चेक आणून दिले जायचे. माझा चेक मात्र आणून दिला नाही. तेव्हा मी विचारलं माझा चेक, यावर मला उत्तर मिळालं, हरवला. तेव्हा मी विचारलं, ‘मग काय करायचं?’ त्यावर ती चॅनलची ep म्हणाली, ‘हरवला, पैसे गेले’.”

आणखी वाचा – “मी आईला घरी बसवलं आणि चॅनलने मला…”, ‘तो’ प्रसंग सांगताना आरती सोळंकीला कोसळलं रडू, म्हणाली, “‘फु बाई फु’मुळे मला…”

आरती पुढे किस्सा सांगत म्हणाली, “पैसे गेले हे ऐकून मला धक्काच बसला. आता पैसे गेले तर मी १४ हजार रुपये देणार कसे. दीड सिझन झाला, तसं पेमेंट खूप ही नव्हतं, जे चॅनेलने ठरवलं होत तेच आम्हाला देण्यात यायचं. तेव्हा मला माझ्या एका दादाने सांगितलं की, ‘तू एक मेल टाक की असं असं घडलं आहे.’ हे ऐकून मी त्या ep ला फोन केला, ‘मेल टाकू का कंपनीला, की असं असं माझा चेक हरवला आहे’, हे ऐकल्यावर ती म्हणाली, ‘थांब थांब, तुला मी कळवते कुठे मेल वगैरे करायचा आहे’. त्यानंतर लगेचच पाच मिनिटात तिचा फोन आला की, ‘तुझा चेक मिळाला आहे, मी देते.’ अशा खूप गोष्टी माझ्याबरोबर घडल्या आहेत. अगदी उठता बसता माझा अपमान व्हायचा.”

Tags: aarti solankiaarti solanki interviewentertainmentfu bai fumarathi actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
Bigg Boss 17 Latest News

Bigg Boss 17 : ब्लँकेटमधील रोमान्स अन् अश्लील कृत्य; ईशा-समर्थच्या ‘त्या’ बेडवरील व्हिडीओची जोरदार चर्चा, प्रेक्षकही भडकले

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.