Aarti Solanki Video : आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाला दोन हात करत माणसं आयुष्यात पाहिलेली स्वप्न पूर्ण करत असतात. पण प्रत्येकासाठी ही स्वप्न पूर्ण करणं साधी गोष्ट नाही. सामान्य कुटुंबातील माणसाला तर नाहीच नाही. अशीच काहीशी गोष्ट अभिनेत्री आरती सोळंकी हिची आहे. अभिनय क्षेत्रातील तिला प्रवास काही साधा नव्हता. बऱ्याच कठीण काळाचा तिला सामना करावा लागला. पण तरीही तिने या खडतर प्रवासातून मार्ग काढत तिची व तिच्या आईची स्वप्न पूर्ण केली. यापैकी एक स्वप्न म्हणजे गाडी घेण्याचं आहे. महागडी गाडी घेतली पण त्यावरुनही लोकांनी मला ऐकवलं. पण त्यामागेही काही कारण होते हे स्पष्ट करताना तिने इट्स मज्जा च्या मज्जाचा अड्डा कार्यक्रमात सांगितलं. (Aarti Solanki share experience about why she buy car)
याबद्दल आरती सांगते, “त्या गाडीवरून मला आपल्या क्षेत्रातले कलाकार हसतात. पैसे नव्हते तर कशाला एवढी मोठी गाडी घेतली. कशाला एवढा मोठेपणा करायचा.त्यांना मी सांगू इच्छिते की, मी खरं तर सेकंड हँड गाडी घेणार होते. दिपाली विचारे यांनी माझ्यासाठी तशी गाडी बघून ठेवली होती. ६० – ७० हजारापर्यंत ही गाडी येणार होती कारण तेवढेच माझ्याकडे पैसे होते. मी म्हटलं गाडी घ्यायची आणि शिकायची. माझ्याकडे त्यावेळला तितकेच पैसे होते.
आरती पुढे सांगते, “त्यावेळेला इव्हेंट व्हायचे. त्या इव्हेंन्टला भाड्याची गाडी घेऊन जायचो. तर सगळ्यांच्या कानावर आलं की मी गाडी घेते आहे. कारण मी सगळ्यांना सांगत होती. सेकंट हँन्ड गाडी कुठे असेल तर सांगा. तर एका कलाकाराने मला सांगितलं, की ‘तु सेकेंन्ड हँन्ड गाडी का घेते आहेस? त्यापेक्षा नवीनच घे’. मी म्हणाले तेव्हा ‘नवीन आपल्याला जमणार नाही एवढे कुठे पैसा आपल्याकडे! हेच ६०-७० हजार रुपयांचे वांदे आहेत’. त्यांनी परत मला सांगितलं, ‘तु वेडी आहेस. जरी सेकेंन्ड़ हँन्ड घेतलीस तरी एक दीड लाख भरावेच लागणार आहेत. डाऊन पेमेंन्ट कर लोन कर पाच वर्षाचा सात वर्षाच जे काही आहे. बघ आपण किती इव्हेंन्ट करतो. महिन्याला ४ ते ५ इव्हेंन्ट करतो महिन्याला तेव्हा आपण गाडी भाड्याने घेतो. त्याचं भाडं जास्त जातात. जर तुझीच गाडी असेल ना तर तुझीच गाडी घेऊन जाऊ ना. ते पैसे तुला घेत जा’. मला ही कल्पना पटली. त्यामुळे मी गाडी घेतली. आम्ही भाड्यानेही घेऊन जाताना गाडीचं जे मोडेल घेऊन जायचो तशीच गाडी मी घेतली”.
आरती पुढे सांगते, “त्यानंतर इव्हेंट सुरु झाले. आम्ही जो गाडी ड्रायव्हर घेऊन जायचो त्याच्या स्वतःच्या गाड्या होत्या. जेव्हा भाड्याने गाडी न्यायचो तेव्हा त्याचीच गाडी न्यायचो कारण त्याच्या गाड्या आहेत ज्या तो भाड्याने लावायचा आणि तोच ड्रायव्हर असायाचा. जेव्हा माझी गाडी आल्यावर त्याची गाडी घेऊन जाणं बंद केलं. पण माझ्या गाडीवर तोच ड्रायव्हर असायचा. हिशोबही सगळे त्याच्यासमोर व्हायचे. तर हे कलाकार मंडळी ड्रायव्हरला द्यायचे पैसे आणि जेवढा काटा गेला तेवढे बरोबर हिशोबाने पेट्रोलचे पैसे द्यायचे. वरचे पैसे असतात ना ते नाही द्यायचे. माझ्या हे लक्षात आलं नाही. मी गाडी घेण्यामध्ये पहिले काही महिने गाडी घेण्यामध्ये तीन चार महिने गेले. त्या ड्रायव्हरने माझ्या आईला सांगितलं. आई माझ्या समोर ठरलं होतं. त्याचं दुःख असं की माझ्यापण गाडी घेऊन जात नाही आणि तिलाही पैसा देत नाही. त्याने आईला सांगितलं की, ‘हिला उल्लू बनवत आहेत हे लोक. ही मला देतात तेवढेच देतात. टोलचे पैसे देतात आणि जेवढा काटा येईल ते मलाच विचारतात किती पेट्रोल झालं तेवढेच पैसे देतात. नफा कुठे आहे ताईला. ज्याच्या वरती ती इएमआय आणि भरणार होती ते कुठं आहे’. माझ्या आईला कळलं की माझ्या मुलीबरोबर हे चुकीचं झालं आहे. मग आईने गाडी देणं बंद केलं. पण जी मोठी गाडी घेतली होती ती या गोष्टीसाठी घेतली होती. दिखाव्यासाठी घेतलीच नव्हती. मोठेपणा चाळीत राहते जेवढा चाळीचा रुम तेवढी गाडी घेतली. ते माझ्या गाडीला बघून आजही हसतात. की माझ्याकडे आजही तिच गाडी आहे. पण माझ्यासाठी ती गाडी तीच नवीन गाडी आहे”, असं सांगत तिने गाडी घेण्यामागचं कारणं स्पष्ट केलं.