प्रेक्षकांना कोणी विचारलं की तुमचं आवडत मनोरंजनाचं साधन कोणतं तर परीक्षक दिलखुलासपणे सांगतात की “महाराष्ट्राची हास्य जत्रा”. महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमामध्ये निव्वळ विनोद करून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जात. या मधील प्रत्येक कलाकारावर जनता भरभरून प्रेम करते. समीर चौघुले, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, रोहित माने, गौरव मोरे, प्रभाकर मोरे, अरुण कदम, यांसारखे अनेक हास्यवीर प्रेक्षकांचं सतत मनोरंजन करत असतात.(Vanita kharat) तर प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर या कार्यक्रमात परीक्षकांची भूमिका पार पडतात आणि प्रेक्षकांसोबतच या हास्य मेजवानीचा आनंद घेत असतात. जत्रेतील या मंडळींच्या प्रेमात पडलेल्या रसिक प्रेक्षकांच्या आयुष्यातील हास्य जत्रा हा एक अविभाज्य घटक झाला आहे.
महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतील हुकुमाची राणी म्हणजे अभिनेत्री वनिता खरात(Vanita kharat),वनिता नेहमीच चर्चेत असते पण आता वनिताच्या आयुष्यात लगीनघाई सुरु आहे,प्री वेडिंग चे सुंदर फोटोज वनिताने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोज जितके हटके आणि सुंदर आहेत तसेच या फोटोवरील कॅप्शन ही प्रेक्षकांना आवडत आहेत. विशेष म्हणजे हे कॅपशन्स वनिताचा हास्यजत्रेतील सहकलाकार अभिनेता पृथ्वीक प्रताप याने दिले आहेत.
बांध फुटावा प्रेमाचा, नजरांचा ही मग डोह व्हावा,
मोगऱ्याच्या फुलांचा, चाफ्याला ही मोह व्हावा।????(Vanita kharat)
मावळतीच्या सूर्याला ही चांदण्यांची प्रीत कळावी,
दृष्ट काढण्या रात सारी काजळाची तीट व्हावी.❤️

बोलक्या प्रश्नांनी साऱ्या कवेतच निरुत्तर व्हावे,
गंध दरवळावा प्रेमाचा आपणही मग अत्तर व्हावे.❤️
कवेत तुझ्या शीण सारे सरावे,
निसटूनी स्वतःतून, तुझ्यात उरावे.❤️
====
====
गुपित मौनांचे नजरेस कळावे,
ओठांचे मग चुंबन व्हावे।❤️(Vanita kharat)
हे कॅप्शन्स वनिताने पोस्ट केलेल्या प्रत्येक फोटोला अजून सुंदर बनवण्यासाठी कारणीभूत आहेत येवढ नक्की.