सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरात प्रसिद्ध झालाय. या कार्यक्रमातील सर्वच कलाकार हे घराघरात प्रसिद्ध झालेत. नुकतंच पहिल्यांदा ही हस्यवारी पहिला परदेश दौरा करून आली. या दौऱ्यावरुन परतल्यानंतर आता सर्वच कलाकार भावूक झाले आहेत. नुकतंच हास्यजत्रेच्या एका कलाकाराने दुबई दौऱ्यावर पोस्ट शेअर केली आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम विनोदी कलाकार पृथ्वीक प्रताप (prutvik pratap) हा कायमच चर्चेत असतो. तो सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. नुकतंच पृथ्वीकने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने काही फोटो आणि व्हिडीओही पोस्ट करत तो भावूक झाला.
पहिला परदेश दौरा (prutvik pratap)
६ वर्षांपूर्वी फक्त document म्हणून काढलेला पासपोर्ट आता खऱ्या अर्थाने कामी आला.
‘४८ तासांच्या’ या दौऱ्यात खरंतर ‘लाखमोलाच्या’ आठवणी साठवून आलोय.
विमानातून दिसणारा ‘इवलूसा’ देश.. जमिनीवर तोऱ्यात उभा असलेला ‘भलाऽऽऽ मोठ्ठा’ बुर्ज खलिफा…
आणि
‘कमाल, खूप सारं, अत्यंत, जास्त, अतिव, किती तरी पटीने, वगैरे वगैरे विशेषण छेदत प्रेक्षकांनी दिलेलं “आभाळाएवढं” प्रेम
हे सगळं कायम स्वरुपी मनाशी घट्ट बिलगून ठेवलंय. अस म्हणत त्याने
टाळ्या, शिट्ट्या मिळालेला त्याच्या प्रिसदाताच वर्णन करत तेव्हा च्या भावना सांगितल्यात.पुढे तो म्हणतो
दुबई मध्ये प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम पाहून माझी मैत्रीण प्रियदर्शिनी इंदलकर माझ्या एका परफॅारमन्स नंतर एक वाक्य म्हणाली होती ते सरकन डोळ्यांसमोर आलं(prutvik pratap)
‘Trust me, PP will be the new SRK’
तेव्हा हे वाक्य मी मस्करीत घेतलं होतं पण आता यापुढे हेच वाक्य मी सत्यात अवतरण्यासाठी कलाकार म्हणून नव्याने उभा राहीन… अस म्हणत त्याने कलेचं त्याच्या आशुषातील महत्त्व सांगितलं आणि थँक्यू सई मला pp बोलण्यासाठी (prutvik pratap)
या पोस्टमध्ये त्याने आनंद आणि भावना व्यक्त केला तर या दुबइतीली चाहत्यांनी देखील कल्करणान भरघोस प्रतिसाद दिला..(prutvik pratap)