सध्या जगभरात विश्वचषकाचे वारे वाहताना दिसत आहेत. २०२३चा क्रिकेट विश्वचषक भारतात आयोजित करण्यात आला आहे. काल भारत विरुद्ध बांगलादेश असा सामना रंगला होता. या सामन्यात भारताने बांगलादेशवर दणदणीत विजय संपादन केला. हा सामना पाहण्यासाठी बऱ्याच मंडळी उपस्थित होत्या. त्यात सचिन तेंडूलकरची मुलगी सारा तेंडूलकरही स्टेडियमवर सामना पाहायला पोहोचली होती. सामन्यादरम्यान तिच्या चेहऱ्यावरील हावभावांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.(sara tendukar cheers for shubhman gill)
विश्वचषक सामने चालू होणार होते त्या दरम्यान क्रिकेटर शुभमन गिल आजारी असल्यामुळे पहिले काही सामने खेळला नव्हते. पण त्यानंतर त्याने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात कमबॅक करत दमदार कामगिरी केली. कालच्या सामन्यातही शुभमनने शानदार कारगिरी केली. त्या मॅचमध्ये ५७ धावा बनवल्या. गिलने एका क्षणाला अशी षट्कार मारली की त्यावर सगळ्यात जास्त ज्या व्यक्तीचं निरिक्षण केलं गेलं ती म्हणजे सारा तेंडूलकर. शुभमनच्या दर्जेदार कामगिरीसाठी सारा त्याला प्रोत्साहन देताना दिसली. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओत सारा आनंदाने टाळ्या वाजवताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरीही खूप रंजक प्रतिक्रिया देत आहेत.
Sara Tendulkar cheering Shubman Gill's boundary. pic.twitter.com/kg8Ed8Gqp7
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 19, 2023
एका नेटकऱ्याने लिहीलं की, ‘सचिन, तुझ्या बाजूने होकार आहे ना?’, तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहीलं की, ‘सारा विहिनी मैदानात आहेत. आज तर आम्हाला १०० धावा पाहिजेत’. तर काहींनी लिहिलं की, ‘आम्ही खूप दिवसांपासून या क्षणाची वाट पाहत होतो’. तर बऱ्याच जणांनी हा व्हिडीओ पाहता या दोघांची बंधन जुळली असल्याचं म्हटलं आहे.

सारा तेंडूलकर व शुभमन गिल एकमेकांच्या डेट करत असल्याच्या बातम्या बऱ्याच दिवासांपासून जोर धरत होत्या. दोघंही बऱ्याचदा एकत्र पाहायला मिळतात. पण मध्ये शुभमन सारा अली खानबरोबर दिसला होता. त्यामुळे शुभमन कोणाला डेट करत आहे ? याबाबत चाहत्यांच्या मनात गोंधळ निर्माण झाला होता. पण या सामन्यातील सारा तेंडुलकरचा जल्लोष पाहिल्यानंतर चाहत्यांचा हा संभ्रम दूर झालेला दिसत आहे.