बरेचदा बाहेर फिरायला जाताना वा एखाद्या कार्यक्रमाला जाताना छान दिसावं अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. पण त्यात आडकाठी घालायला पिंपल्स, पुरळ यांसारखे प्रकार आमंत्रण न देता अगदी आवर्जून भेटीस येतात. बरं या समस्यांमधून महिला कलाकार मंडळी ही अनेकदा गेल्या आहेत. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने या समस्येला तोंड द्यावे लागलं असल्याचं समोर आलं आहे. ‘बिग बॉस मराठी ३’ मधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सोनाली पाटील. (Sonali Patil On Girls Problem)
‘बिग बॉस’ तसेच ‘वैजू नंबर १’ या कार्यक्रमातून सोनाली घराघरांत पोहोचली. सोनालीने तिच्या कोल्हापुरी ठसक्याने साऱ्या प्रेक्षकांच्या मनात घर केलं. ‘बिग बॉस’मुळे सोनालीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. शिवाय सोनालीचा सोशल मीडियावरील वावरही बऱ्यापैकी मोठा आहे. ती नेहमीच तिचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावरून चाहत्यांसह शेअर करत असते. चाहतेही सोनालीच्या प्रत्येक व्हिडीओवर कमेंट करत तिच्या संपर्कात राहत असतात. अशातच सोनालीने महिलांच्या समस्येबाबत शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
सोनालीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती बोलतेय की, “बरं, आज एका कार्यक्रमासाठी तयार झाली आहे. तुम्हाला दिसत असेल मी छान मेकअप केला आहे. पण कालपासून मला एक प्रश्न पडला आहे. हा पिंपल का आला असेल? आपला जेव्हा खूप महत्त्वाच्या कार्यक्रम असतो. तेव्हा अशी पिंपल्स का येतात? म्हणजे कशासाठी? बरं हे एवढं दिसतंय आणि दुखतंय ना. मुलींच हे दुःख मुलींनाच माहिती आहे. पण महत्त्वाच्या कार्यक्रमादरम्यान अशी पुरळ का येते? इतकं गरजेचं असतं का?” या व्हिडिओला तिने का? कृपया मला सांगा?” असे प्रश्नार्थक कॅप्शन दिले आहे.
सोनालीच्या या व्हिडिओवर अनेक नेटकाऱ्यानी कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे की, “नजर लागली ना तर पिंपल उठतात नक्कीच माझी किंवा चाहत्यापैकी कोणाची तरी नजर लागली असेल, नजर मिरची ओवाळून काढुन घेत जा”. तर आणखी एका युजरने कमेंट करत म्हटलं आहे की, “सोनाली जेव्हा तुम्हाला नजर लागते ना तेव्हा पिंपल्स येतात चेहऱ्यावर”. तर एका चाहत्याने गमतीशीर कमेंट करत म्हटलं आहे की, “कुछ डाग अच्छे होते है, सुंदरतेला नजर लागू नये याकरिता”.