बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी कंगनाने तिच्या ‘तेजस’ चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाचा टीझर नुकताच समोर आला होता, ज्याचं प्रेक्षकांनी कौतुक केलं होतं. त्याचबरोबर अभिनेत्रीच्या आणखी एका चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे, तो म्हणजे ‘Emergency’. काही महिन्यांपूर्वी कंगनाने टीझर शेअर केला होता, तो जोरदार व्हायरल झाला होता. तिच्या अभिनयाचे व लूकचे त्यावेळी भरभरून कौतुक करण्यात आले होते. (Emergency Movie postponed)
जेव्हा या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला, तेव्हापासून या चित्रपटाचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. आधी हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित होणार होता. मात्र, आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे. ज्यामुळे तिचे चाहते नाराज झाले. कंगनाचा हा चित्रपट आता पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. त्याची घोषणा तिने ट्विटरवर केली आहे.
ती या ट्विटमध्ये म्हणाली, “प्रिय मित्रांनो, मला एक महत्वाची घोषणा करायची आहे. ‘Emergency’ हा चित्रपट एक कलाकार म्हणून माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा चित्रपट आहे. या चित्रपटासाठी मी माझं संपूर्ण आयुष्य समर्पित करत असून मला खूप काही शिकण्यास मिळत आहे. हा माझ्यासाठी केवळ चित्रपट नाही, तर माणूस म्हणून माझ्या पात्राची आणि माझ्या पात्रतेची ही परीक्षा आहे. तुम्ही आमच्या चित्रपटाच्या टीझरला जो प्रतिसाद दिला, त्यामुळे आम्हां सर्वांना एक प्रेरणा मिळाली, हे पाहून मला भरून येते.”
हे देखील वाचा – “कृपया मला मदत करा…”, भारत – पाक मॅचदरम्यान उर्वशी रौतेलाचा २४ कॅरेट सोन्याने जडलेला आयफोन गेला चोरीस, ट्विट करत केलं मदतीचं आवाहन
“जिथे मी जाते, तिथे लोक मला चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दल विचारतात. आम्ही ‘Emergency’ चित्रपट २४ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रदर्शित करणार होतो. पण, सलग प्रदर्शित होणाऱ्या माझ्या चित्रपटांमुळे आणि चित्रपटांच्या कॅलेंडरमधील बदलांमुळे हा चित्रपट आम्ही पुढील वर्षी म्हणजे २०२४ मध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच आम्ही चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख घोषित करू, तोपर्यंत तुमचं या चित्रपटाबद्दलची अपेक्षा, उत्सुकता आणि उत्साह असेच कायम असू द्या.”, असं ती म्हणाली.
हे देखील वाचा – ‘कुछ कुछ होता है’नंतरच मुबंईमध्ये करण जोहरने घेतलं होतं पहिलं घर, स्वतःच केला खुलासा, म्हणाला, “कठीण काळामध्ये…”
Dear friends,
— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 16, 2023
I have an important announcement to make, Emergency movie is the culmination of my entire life’s learnings and earnings as an artist.
Emergency is not just a film for me it’s a test of my worth and character as an individual.
Tremendous response that our teaser and…
दरम्यान, ‘Emergency’ हा चित्रपट १९७५ मध्ये झालेल्या आणीबाणीवर आधारित आहे. ज्यात कंगना इंदिरा गांधींची मध्यवर्ती भूमिका साकारणार आहे. तर अभिनेते अनुपम खेर, मिलिंद सोमण, श्रेयस तळपदे, भूमिका चावला, महिमा चौधरी आदी कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. सध्या ती तिच्या आगामी ‘तेजस’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असून तिचा हा चित्रपट येत्या २० ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.