करण जोहर दिग्दर्शित त्याकाळातील सुपरहिट ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाला आज २५ वर्ष पूर्ण झाली आहे. १६ ऑक्टोबर १९९८ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी हे मुख्य भूमिकेत होते. विशेष म्हणजे, करणने याच चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले होते. चित्रपटातील गाणी असो, किंवा डायलॉग, किंवा कलाकारांचा अभिनय; एकूणच या चित्रपटाने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. त्याचबरोबर, बॉक्स ऑफिसवर देखील चांगली कमाई केली होती. अशातच दिग्दर्शकाने दिलेल्या एका मुलाखतीत या चित्रपटाबद्दलच्या अनेक आठवणी सांगितल्या आहेत. (Karan Johar shared his memory on 25 years of Kuch Kuch Hota Hai)
चित्रपटाला २५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त करणने नुकतंच ‘ई-टाईम्स’ला मुलाखत दिली आहे. ज्यामध्ये तो चित्रपटातील आठवणी सांगताना अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. करणचे वडील यश जोहर हे प्रसिद्ध सिनेनिर्माते होते. त्यांनी ‘दोस्ताना’, ‘अग्निपथ’ यांसारख्या अनेक चित्रपटांची निर्मिती केली होती. मात्र, दोस्ताना चित्रपट सुपरहिटनंतर त्यांना दीर्घकाळ मोठ्या हिट चित्रपटाची प्रतीक्षा करावी लागली होती. या सगळ्यांमुळे त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. काही काळानंतर करणने दिग्दर्शित केलेला चित्रपट सुपरहिट ठरला, त्यानंतर कधीच त्याने मागे वळून पाहिलं नाही.
हे देखील वाचा – Tiger 3 Trailer : अंगावर काटा आणणारा ‘टायगर ३’चा ट्रेलर प्रदर्शिता, सलमान खानपेक्षा कतरिना कैफचीच रंगली चर्चा, काही मिनिटांमध्ये लाखो व्ह्युज
करण यावेळी म्हणाला, “माझे वडील यश जोहर यांचा पहिला चित्रपट ‘दोस्ताना’ सुपरहिट झाला. पण, त्यानंतर त्यांच्या अनेक चित्रपटांना व्यावसायिक यश मिळाले नाही. त्यामुळे आम्हाला अनेक संकटांना सामोरं जावं लागलं होतं. ते ज्या कठीण प्रसंगातून जात होते, ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. पुढे यश चोप्रा ज्यांना मी वडिलांसारखा मानतो, त्यांनी मला त्यांच्या ‘यशराज फिल्म्स’साठी चित्रपट दिग्दर्शित करण्यास सांगितले होते. हे जेव्हा मी माझ्या वडिलांना सांगितलं, तेव्हा ते म्हणाले होते की, ‘तू माझा मुलगा आहेस, त्यामुळे तू धर्मा प्रोडक्शनसाठी चित्रपट दिग्दर्शित केल्यास मला समाधान वाटेल.’ मी त्यांना विचारलं की, हे आपल्याला परवडणार आहे का? तेव्हा त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि सांगितलं, की मी यासाठी कर्ज घेणार आहे.”
हे देखील वाचा – ‘सिंघम अगेन’मध्ये महिला पोलिसाच्या भूमिकेत दिसणार दीपिका पदुकोण, लूक पाहून नवऱ्याची मराठीत पोस्ट, म्हणाला, “आली रे आली…”
हे सांगतांना त्यांनी करणला एक सल्ला दिला की, “करण, आपण यामध्ये सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू. परंतु या अवघड काळात जर आपला चित्रपट चालला नाही. तर मला असं वाटत नाही की, तू काहीतरी करत राहावं जिथे तुम्हाला सतत यश मिळत नसेल, आणि जे मी तुझ्याकडून मागत आहे ते तेच आहे.” माझे वडील सिनेक्षेत्रातील प्रिय व्यक्ती होते. केवळ ते माझ्याबद्दल नव्हते, तर प्रत्येकाला वाटत होते, की आपण त्यांच्या चित्रपटात काम करावं. पुढे ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केल्यानंतर आम्ही मुंबईत आमचे पहिले घर घेतले. अनेक वर्षांनी माझा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला, तेव्हा माझ्या वडिलांना प्रदर्शनावेळी पहिल्यांदाच हसताना पाहिलं होतं.”, हे सांगताना करण जोहर भावुक झाला होता.