छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता पृथ्वीक प्रतापने त्याच्या विनोदी अभिनयाने रसिक प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं आहे. पृथ्वीकची या कार्यक्रमामुळे देश-विदेशात त्याचा मोठा चाहतावर्ग बनला आहे. एकांकिकेमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या पृथ्वीकने अनेक मालिका व चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याचबरोबर, बॉलिवूड स्टार शाहरुख खानची निर्मिती असलेल्या ‘क्लास ऑफ ८३’ या वेबसीरिजमध्ये तो झळकला आहे. पृथ्वीकने विविध व्यक्तिरेखा साकारत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. (Prithvik Pratap shared a Throwback photos)
काही दिवसांपूर्वी पृथ्वीक ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या कलाकारांसह अमेरिकेला गेला होता. त्यावेळी तो अमेरिकेतील रस्त्यांवर मनसोक्त फिरताना दिसला. त्यावेळी त्याने त्याच्या आईच्या साडीपासून बनवलेला खास कुर्ता परिधान केला होता. त्याबद्दलचा एक रील त्याने शेअरदेखील केला होता, ज्याची प्रचंड चर्चा झाली होती. आता त्याच अमेरिका दौऱ्यातील काही आठवणी सांगताना त्याने इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे.
हे देखील वाचा – रवी जाधव यांचा भाऊ अजूनही चालवतो रिक्षा, भावाबाबत बोलताना दिग्दर्शकाचे डोळे पाणावले, म्हणाले, “मला झोप लागत नाही कारण…”
त्याने या पोस्टला गमतीशीर कॅप्शन देत म्हणाला, “Brooklyn Bridge, आईच्या साडीपासून तयार केलेला कुर्ता आणि माझ्या चेहऱ्यावरील स्माईल… या गोष्टींवर लक्ष देण्याव्यतिरिक्त माझी चप्पल आणि बाजूची फॅारेनर यावर लक्ष देणारे, मला जरा नंतर भेटा.” त्याच्या या पोस्टवर चाहतेसह नेटकरी भन्नाट कमेंट करताना दिसत आहे. एक नेटकरी म्हणाला, “मी तर आधी तुलाच पाहिलं नंतर त्या फॉरेनर मुलीला, आणि नंतर तुझा कॅप्शन वाचून मग तुझी चप्पल पाहिली.” तर दुसरा एक नेटकरी म्हणाला, “कॅप्शन वाचल्यानंतर लगेच फॉरेनर शोधायला घेतली.” तर काही चाहत्यांनी त्याचे कौतुक केले आहे. एकूणच त्याच्या या पोस्टची जोरदार चर्चा होत आहे.
हे देखील वाचा – दुसरं लग्न कर म्हणून लेक सतत सांगत होती; तरीही अविवाहितच का राहिल्या शुभांगी गोखले?, म्हणालेल्या, “मोहनच्या जाण्याने…”

अनेक मालिका, वेबसीरिजमध्ये झळकल्यानंतर पृथ्वीक लवकरच ‘डिलिवरी बॉय’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. ज्यामध्ये तो अभिनेता प्रथमेश परबसह स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. चाहते त्याच्या या नव्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे.