बॉलिवूड अभिनेत्री शहनाज गिल नेहमीच लाइमलाईटमध्ये राहते. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीचा ‘थैंक यू फॉर कमिंग’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्यात तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. अशातच तिच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एकीकडे चित्रपटाची टीम हे यश साजरा करत असताना शहनाजला अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. (Shehnaaz Gill hospitalised)
सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी शहनाझ गेल्या काही दिवसांपासून ‘थैंक यू फॉर कमिंग’च्या टीमसह चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. त्यादरम्यान पार पडलेल्या एका कार्यक्रमात तिला विषबाधा झाली. ज्यामुळे तिला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यानंतर अभिनेत्रीने इन्स्टाग्राम लाईव्हद्वारे तिच्या चाहत्यांना आरोग्यासंबंधित माहिती दिली आहे.
हे देखील वाचा – “अश्लिलतेची हद्दच पार केली”, प्रियांका चोप्राच्या आईला पारदर्शक कपड्यांमध्ये पाहून नेटकऱ्यांचा संताप, म्हणाले, “अंतर्वस्त्र…”
रुग्णालयातील व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्रीने सांगितलं की, “सर्वांची वेळ येते… आता माझी वेळ आली आहे. सँडविच खाल्ल्याने मला विषबाधा झाली होती, पण आता माझी प्रकृती स्थिर आहे.” अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल होताच चाहते चिंतेत पडले असून तिच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना करत आहे. त्याचबरोबर ते तिला काळजी घेण्याचा सल्लादेखील देत आहे. दरम्यान, अभिनेत्रींच्या आजारपणाची माहिती कळताच चित्रपटाची निर्माती रिया कपूरने शहनाजची भेट घेतली.
हे देखील वाचा – Video : राखी सावंतला आला मुकेश अंबानींचा फोन, नीता अंबानींशीही बोलली, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
Get well soon ShehnaazGill is in Hospital ????????#ShehnaazGiIl #shehnaazkaurgill #Shehnaazians #ShehnaazKaurGiII #ShehnaazGallery pic.twitter.com/CKANiBIWex
— Asmakhan (@zoyakhan9948a) October 9, 2023
शहनाज गिल तिच्या कामाबरोबर तिच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. याआधी ती अनेक मालिकांमध्ये दिसली असली, तरी तिला खरी लोकप्रियता ‘बिग बॉस’ शोमुळे मिळाली आहे. शोदरम्यान शहनाज आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांच्यामध्ये प्रेम बहरलं होतं. मात्र, अभिनेत्याच्या निधनानंतर शहनाज पूर्णपणे कोलमडली होती. या धक्क्यातून सावरल्यानंतर ती तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यग्र आहे. मध्यंतरी, तिचं नाव पंजाबी गायक गुरु रंधावा याच्याशी जोडलं गेलं. पण तिने यावर मौन बाळगलं पसंत केलं आहे.