‘देवो के देव महादेव’, ‘सिया के राम’, ‘देवयानी’ यांसारख्या मालिकांमधून अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिने छोटा पडदा गाजवला. सोशल मीडियावर ही भाग्यश्री कायमच सक्रिय असते. नेहमीच ती तिच्या फोटोशूटची झलक इंस्टाग्राम वरून शेअर करत असते. बऱ्याच दिवसांपूर्वी ही अभिनेत्री चर्चेत आली होती. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या भाग्यश्री व तिच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. भाग्यश्रीची बहीण मधू मार्कंडेय हिच्या निधनाच्या बातमीने भाग्यश्री व तिच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली होती. (Bhagyashree Mote On Her Sister)
भाग्यश्री व तिची बहीण मधू यांचं बॉण्डिंग अधिक घट्ट होतं. भाग्यश्रीच तिच्या बहिणीवर विशेष प्रेम होतं. शिवाय मधूने ही भाग्यश्रीला तिच्या प्रत्येक प्रवासात तिला साथ दिली होती. त्यामुळे भाग्यश्री व मधू यांचं एकमेकांवर विशेष प्रेम होतं. मात्र मधूच्या मृत्यूंनंतर भाग्यश्री चांगलीच कोलमडली. आजही ती तिची मोठी बहीण मधूला मिस करत आहे. भाग्यश्रीने मधुच्या आठवणीत इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यांत तिने तिची बहीण मधुबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे, आणि त्याखाली कॅप्शन लिहीत म्हटलं आहे की, “कदाचित मागील चांगला वेळ मी पुन्हा आणू शकले असते. तू मला सर्वात आनंदी केल आहेस! तुझी जागा नेहमी माझ्या हृदयात आहे!” असं म्हणत बहिणीची आठवण येत असल्याचं म्हटलं आहे.
तसेच मध्यंतरी भाग्यश्रीने इन्स्टाग्रामवर वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये ही भाग्यश्रीने तिच्या बहिणीला मिस करत असल्याचं म्हटलं होतं. “हा तुझा आमच्यासोबतचा शेवटचा वाढदिवस आणि त्याचे हे फोटो! तू माझं खरं प्रेम आहेस. तू माझी आहेस, होतीस आणि कायमच राहशील. भूतकाळात काय घडलं, याचा उल्लेख करणं हे फारच त्रासदायक आहे. आपण नियतीमुळे वेगळे झालो असलो, तरीही मनाने कायमच एकत्र आहोत. तुझ्या विचारांशिवाय आणि आठवणींशिवाय आमचा एकही दिवस जात नाही. वाढदिवस हा तुझ्या आवडीचा प्रसंग आहे आणि आज मला तुझी खूप आठवण येतेय.” अशी भावुक पोस्ट शेअर केली होती.
भाग्यश्रीची बहीण मधू मार्कंडेय हिचं निधन झालं असून तिचा संशयास्पद मृत्यू झाला असून घातपाताची शक्यता नातेवाईकांनी वर्तवली आहे. शिवाय मधूच्या चेहऱ्यावर काही जखमा आढळल्या आहेत. अदयाप या प्रकरणाचा निकाल लागलेला नाही, भाग्यश्रीची बहीण मधू हिला न्याय मिळेल का?, हे प्रकरण नेमकं कोणतं वळण घेईल हे लवकरच कळेल.