‘बिग बॉस’ फेम गायक गायक राहुल वैद्य व टीव्ही अभिनेत्री दिशा परमार यांच्या घरी नुकतेच चिमुकलीचे आगमन झाले आहे. दिशाने गणेश चतुर्थीच्या दिवशी बाळाला जन्म दिला असून आज दिशा व तिच्या बाळाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. दरम्यान, वाढदिवशी डिस्चार्ज मिळताच या जोडीने बाळासह सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. (Disha Parmar and her Baby got discharge on Rahul Vaidya Birthday)
दरम्यान, रुग्णालयातून बाहेर पडताच राहुलने उपस्थित माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तो म्हणाला, की गणेश चतुर्थीच्या दिवशी आमच्या घरी लक्ष्मीचे आगमन झाले आहे. आज माझा वाढदिवस आणि या खास दिवशी माझी मुलगी आणि पत्नी यांना डिस्चार्ज मिळाला आहे. यापेक्षा चांगली वाढदिवसाची भेट जगात क्वचितच कोणीच देऊ शकणार नाही. मी यासाठी देवाचेही आभार मानतो, तुम्ही सर्वांनी माझ्या मुलीला आशीर्वाद द्या.”
हे देखील वाचा – मुलीचं नाव काय ठेवणार? याबाबत राहुल वैद्यचा खुलासा, म्हणाला, “नावं काढली आहेत पण…”
त्याचबरोबर बाळाच्या नावाबद्दल गायकाला विचारले असता तो म्हणाला, “मुलीचं नाव तिची आजी ठेवणार असून जे काही नाव ते ठरवतील, ते लवकरच तुमच्याबरोबर आम्ही शेअर करू.” तर दिशाने तिच्या चाहत्यांकडे बाळासाठी आशीर्वाद मागितले आहे. यावेळी बाळाला हातात घेताना राहुलच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता.
हे देखील वाचा – “न झुकता पाठीचा कणा…”, किरण मानेंची शाहरुख खानसाठी पोस्ट, म्हणाले, “कधी कुणाला नमस्कार करत नाही कारण…”
अनेक वर्ष एकमेकांना देत केल्यानंतर जुलै २०२१ मध्ये राहुल वैद्य आणि दिशा परमार हे विवाहबंधनात अडकले होते. काही दिवसानंतर त्यांनी एक पोस्ट शेअर करत आनंदाची बातमी दिली होती. २० सप्टेंबरला हे दोघं आई-बाबा झाल्यापासून चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे.