देशभरात गणेशोत्सवाची धामधूम पाहायला सध्या मिळत आहे. सर्वसामान्यांप्रमाणे कलाकार मंडळीच्या घरी गणरायाचे आगमन झाले आहे. सर्वत्र भक्तिभावाने बाप्पाची आराधना करताना दिसत आहे. बाप्पाच्या आगमनाने सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक जण एकमेकांच्या घरी बाप्पाचे दर्शन घेत आहे. प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानींच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले असून यावेळी त्यांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी बॉलिवूडसह अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. (Celebrities in Mukesh Ambani Ganeshotsav)
मुकेश अंबानींच्या घरच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्राचे लाडके दादा-वाहिनी रितेश देशमुख व जिनिलिया देशमुख यांनी हजेरी लावली होती. यावेळी दोघांनी केलेल्या पारंपरिक लुक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याचबरोबर अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने पती श्रीराम नेने यांच्याबरोबर अंबानींच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आली आहे. अभिनेता अजय देवगण, दिग्दर्शक रोहित शेट्टी, अभिनेत्री जान्हवी कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी, ज्येष्ठ अभिनेत्री रेखा व यांसारख्या अनेक बॉलिवूडच्या कलाकारांनी हजेरी लावली होती.
हे देखील वाचा – ‘थ्री इडियट्स’ फेम अभिनेत्याचा स्वयंपाकघरामध्ये पडून धक्कादायक मृत्यू, पत्नीची अवस्थाही बिकट, म्हणाली, “जोडीदारच गेला अन्…”
त्याचबरोबर प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी, आलिया भट्ट, दिशा पटानी, जुही चावला, श्रद्धा कपूर, दिग्दर्शक अयान मुखर्जी यांसारख्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. तर अभिनेता बोमन इराणी त्यांच्या पत्नीसह आणि सलमान खानने त्याच्या भाचीसह या सोहळ्याला हजेरी लावली होती. या कलाकार मंडळींव्यतिरिक्त विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर देखील अंबानींच्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी त्यांच्या अँटिलिया या निवासस्थानी पोहोचले होते. यावेळी गणेशोत्सवानिमित्त मुकेश अंबानी यांच्या घरात केलेली सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.