सध्या चित्रपटगृहांमध्ये शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाची चलती असलेली पाहायला मिळतेय. बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतोय. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक, चाहते ‘जवान’ चित्रपटाचं व किंग खानचं भरभरून कौतुक करताना दिसत आहेत. अनेक चाहत्यांनी तर शाहरुख खानच्या मन्नत बाहेर गर्दी केलेली पाहायला मिळाली. शाहरुख खान म्हणजेच किंग खानचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. अशातच कलाकार मंडळींही शाहरुखचे चाहते आहेत. आता या चाहत्यांना ‘जवान’ची भुरळ पडली आहे. (Hemangi Kavi New Post)
कलाकार मंडळींनीही वेळात वेळ काढून जवान चित्रपट पाहायला हजेरी लावली आहे. नुकतीच या संदर्भांतील अभिनेता किरण मानेची पोस्ट चर्चेत होती. अभिनेता किरण माने यांनी शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट पाहिला आणि चित्रपटाचे व शाहरुखचे भरभरून कौतुक करणारी पोस्ट देखील शेअर केली. यांनतर आता शाहरुखची खूप मोठी चाहती असलेल्या एका अभिनेत्रींच्या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी.

हेमांगी कवी हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेली पोस्ट साऱ्यांचं लक्ष वेधून घेतेय. कारण हेमांगी वेळात वेळ काढून ‘जवान’ चित्रपट पाहायला निघाली आहे. चित्रपट पाहायला जातानाचा एक फोटो पोस्ट करत तिने लिहिलेलं कॅप्शन अधिक लक्ष वेधून घेत आहे. “आमच्या माणसाचा भारीतला शर्ट ढापुन, शारक्याचा जवान बघायला मी…, चलेया ‘तेरी ओर, मैं ता चलेया’ असं कॅप्शन तिने दिल आहे. हेमांगी तिच्या आवडत्या अभिनेत्याचा चित्रपट पाहायला तिच्या आवडत्या व्यक्तीचा म्हणजेच तिच्या नवऱ्याचा शर्ट घालून निघाली आहे.
तब्बल चार वर्षांनी यंदा शाहरुख खानने ‘पठाण’ व ‘जवान’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर कमबॅक केलं. आणि त्याच्या या दोन्ही चित्रपटांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतोय. वास्तविकतेवर भाष्य करणाऱ्या या ‘जवान’ चित्रपटाचं जगभरातून कौतुक केलं जात आहे.