मराठी कलाविश्वातील सर्वात क्युट जोडी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर व अभिनेत्री मिताली मयेकर सतत कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थने आपल्या आईचं दुसरं लग्न लावले होते, ज्याचे कलाकार मंडळींसह चाहत्यांनी कौतुक केले होते. ही जोडी अनेकदा विविध ठिकाणी सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे. त्यांच्या सुट्टीदरम्यानचे अनेक फोटोज व व्हिडिओज सोशल मीडियावर नेहमीच शेअर होतात. अशातच या जोडीचा आणखी एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. (Mitali Mayekar Video)
सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकर ही लाडकी जोडी सध्या दुबईमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. यादरम्यानचे अनेक फोटोज ते सोशल मीडियावर शेअर करत आहे. असाच एक व्हिडिओ सिद्धार्थने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये सिद्धार्थची पत्नी मिताली ही चित्र काढताना दिसत आहे.
हे देखील वाचा – Video : जुई गडकरीने घरीच बनवला चिवडा, रेसिपीही सांगितली, म्हणाली, “कर्जतला जेव्हा पहिला पाऊस पडायचा तेव्हा…”
सिद्धार्थने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ही जोडी दुबईत सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये मिताली दुबईतील उंच इमारतींचे चित्र काढत आहे. या व्हिडिओसह दिलेल्या कॅप्शनमध्ये सिद्धार्थ म्हणतो, “आणि म्हणे मी मोठी झालिये!”. सिद्धार्थच्या या व्हिडिओवर नेटकरी कमेंट्स करत आहे. तर काहींनी कमेंट्समध्ये मितालीच्या चित्रकलेचे कौतुक केले आहे.
हे देखील वाचा – Video : …अन् अशोक सराफ यांना रडू कोसळलं, ‘सारेगमप’च्या मंचावर नेमकं काय घडलं?
सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकर हे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर २०२१ मध्ये हे दोघे विवाहबंधनात अडकले. ही क्युट जोडी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून यांच्या रोमँटिक फोटोशूट्सची नेहमीच चर्चा होत असते. नुकतंच या जोडीने मुंबईमध्ये त्यांच्या हक्काचं घर देखील खरेदी केलं, ज्याचीदेखील जोरदार चर्चा झाली होती.