रविवार, मे 11, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आमिर खानने मराठमोळी अमृता सुभाषला लिहिलं होतं प्रेमपत्र, अभिनेत्रीनेच सांगितल’ होतं तेव्हा नेमकं काय घडलं?

Ankita Shindeby Ankita Shinde
सप्टेंबर 7, 2023 | 3:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
marathi actress Amruta subhash

marathi actress Amruta subhash

‘अवघाचि संसार’ या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांसमोर आलेली उत्कृष्ट अभिनेत्री म्हणजे अमृता सुभाष. मराठीसह हिंदी चित्रपटात अभिनयाच्या कौशल्यावर एक वेगळीच ओळख तिने निर्माण केली. अमृता ही प्रसिद्ध अभिनेत्री ज्योती सुभाष यांची मुलगी आहे. हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषेमधीस नाटकांत तिने काम केलं. तिचं ‘ती फुलराणी’ हे नाटक तुफान गाजलं. २००४साली तिने ‘श्वास’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. अमृता ही एक प्रशिक्षित शास्त्रीय गायिकासुद्धा आहे. अमृता सुभाष ही उत्तम लेखिका असून तिचं २०१४ साली ‘एक उलट एक सुलट’ हे पुस्तक प्रकाशित झालं आहे.(marathi actress Amruta subhash)


तिच्या अभिनयाच्या कौशल्यावर ती प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. सुबोध भावे यांच्या ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात तिने हजेरी लावली होती. यात दिलखुलास गप्पा मारत तिने आतापर्यंतच्या आयुष्यातील आठवणींना उजाळा दिला. ”ज्या आमिर खानच्या प्रेमात असंख्य तरुणी आहेत त्याला प्रपोज करण्यासाठी त्या धडपडत असतात. त्या आमिर खानने तुला प्रपोज केलं आणि तू त्याला नाही म्हणालीस ?” असा प्रश्न सुबोधने तिला विचारला होता.

View this post on Instagram

A post shared by Amruta Subhash (@amrutasubhash)

यावर उत्तर देत अमृता म्हणाली, ”नाही असं काही नाही. मी कशी नाही म्हणेन. ‘कयामत से कयामत’ हा चित्रपट पाहिल्यानंतर मी घायमोकलून रडत होती. कारण तो शेवटी चित्रपटात मरतो. नंतर मला लक्षात आलं की हाच ‘तो’ दुसरं कोणी माझ्या आयुष्यात असू शकत नाही. तर मला असं कुणीतरी म्हंटल की, त्याचं लग्न झालं. मग मी म्हंटल नाही नाही त्याला कळेल मीच ती. असं मला का वाटलं माहित नाही”.

आणखी वाचा: ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम प्राजक्ता गायकवाडची जालना लाठीचार्ज प्रकरणावर संतापजनक पोस्ट, म्हणाली “रक्त पेटलंय…”


पुढे ती म्हणाली, ”एकेदिवशी मला इंग्रजीमध्ये पत्र आलं. त्या पत्रात ‘तुम मेरे हो’ मधील आमिरचा फोटो आणि खाली आतमध्ये लिहलं होत ‘Dearest Amruta with lots and lots of love – Amir’. ते पत्र बघून मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही. मी म्हंटल हो मला माहित आहे हेच ते खरं प्रेम. मला असं वाटलं माझ्या मनातलं प्रेम त्याला ऐकू गेलं आणि हे पत्र त्याने मला पाठवलं. मी रुबाबात घरात आईला सांगितलं. आईने हे दिवसभर ऐकून घेतलं. त्यावर ती म्हणाली हे सुहास मावशीने केलेलं आहे. ‘तुम मेरे हो’ यात सुहास जोशी काम करत होत्या तेव्हा त्यांनी आमिरला सांगितलं माझ्या भाचीला तू खूप आवडतोस तर तू पत्र लिहशील का? आमिर म्हणाला why not ? असं समजल्यावर माझा हृदयभंग झाला होता”. अमृताचा हा किस्सा फारच रंजक आहे.

Tags: aamir khanactorsamruta subhash
Ankita Shinde

Ankita Shinde

Latest Post

Hina Khan Received Threats
Entertainment

धर्म, पाकिस्तान अन् त्रास; मुस्लिम म्हणून हिना खानला थेट धमक्या, म्हणाली, “सीमेपलीकडील लोकांवरही प्रेम केलं पण…”

मे 10, 2025 | 6:17 pm
Soldier Viral Video
Social

जवानांना पाहताच चिमुकलीने केला नमस्कार, सॅल्युट करायचं विसरली म्हणून पुन्हा आली अन्…; Video व्हायरल

मे 10, 2025 | 5:11 pm
Pakistani Anchor Viral Video
Entertainment

सेलिब्रिटींना शिव्या, पाकिस्तानी सैन्याचं दुःख सांगत रडली अन्…; अँकरचा कॅमेऱ्यासमोर ड्रामा, Video व्हायरल

मे 10, 2025 | 4:33 pm
operation sindoor soldier news
Women

आठ महिन्याची लेक कडेवर घेत पतीला अखेरचा निरोप, शहीद जवान सचिन वनांजेंच्या पत्नीच्या अश्रूंचा बांध फुटला अन्…; मुखाग्नी देताना…

मे 10, 2025 | 2:32 pm
Next Post
Nikhil bane home tour

Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेने चाळीतचं उभारलं त्याच्या स्वप्नातलं घर, आतून नेमकं कसं दिसतं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.