श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरन याच्या जीवनावर आधारित ‘800’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आज या चित्रपटाचा ट्रेलर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते मुंबईत प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, या चित्रपटाचा टीझर काल प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये मुथय्या मुरलीधरनच्या भूमिकेत ‘स्लमडॉग मिलेनियर’ फेम अभिनेता मधुर मित्तल दिसणार आहे. ट्रेंड अनॅलिस्ट तरण आदर्श यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. (800 Movie Trailer Launch)
मुथय्या मुरलीधरनच्या जीवनावर आधारित ‘800’ चित्रपटाची निर्मिती मूव्ही ट्रेन मोशन पिक्चर्स आणि विवेक रंगाचारी यांनी केली आहे. तर लेखन-दिग्दर्शन एमएस श्रीपाथी यांनी केले असून हा चित्रपट ३ भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याआधी, काल या चित्रपटाचे टीझर प्रदर्शित झाले. ज्यात मुरलीधरनच्या आयुष्याशी संबंधित काही महत्त्वाच्या घटना दाखवण्यात आल्या आहेत. दरम्यान, चित्रपट कधी प्रदर्शित होणार, हे माहित नसले. तरी ट्रेलर लॉन्चच्या निमित्ताने याची माहिती देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.
हे देखील वाचा – ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम प्राजक्ता गायकवाडची जालना लाठीचार्ज प्रकरणावर संतापजनक पोस्ट, म्हणाली “रक्त पेटलंय…”
SACHIN TENDULKAR TO UNVEIL TRAILER OF MUTHIAH MURALIDARAN BIOPIC ‘800’… #SachinTendulkar will unveil the trailer of the #MuthiahMuralidaran biopic, titled 800 [#800TheMovie], on [Tuesday] 5 Sept 2023 at an event in #Mumbai.#MadhurrMittal – who won acclaim for his performance… pic.twitter.com/cwjIN1vAmY
— taran adarsh (@taran_adarsh) September 4, 2023
खरंतर या चित्रपटात प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपती मुरलीधरनची भूमिका साकारणार होता, मात्र, नंतर त्याच्या नावाला विरोध झाल्याने त्याने या चित्रपटातून माघार घेतली होती. व या भूमिकेसाठी मधुर मित्तलची वर्णी लागली. अभिनेता मधुर मित्तलने ऑस्कर विजेत्या ‘स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली होती. तसेच त्याने मिलियन डॉलर आर्म, कहीं प्यार ना हो जाये या चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे.