आज रक्षाबंधन, श्रावण महिन्यात साजरा केला जाणारा एक पवित्र असा सण. भाऊ-बहिणींच्या नात्यांचा, हक्काचा सण. या पवित्र दिवशी बहीण भावाचे औक्षण करून एकमेकांचे रक्षण करण्याचे आजन्म वचन देतात. रक्षाबंधनाला प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीसाठी आपल्या कामाच्या व्यापातून आवर्जून वेळ काढतात. कारण या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळून त्याचा हातावर राखी बांधते आणि आपले भावाविषयी प्रेम व्यक्त करते. (Raksha Bandhan)
मराठी मनोरंजनविश्वात असे अनेक भाऊ-बहिणीच्या जोडी आहेत, ज्यांनी आजवर प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. कोण आहेत या भाऊ-बहिणींच्या जोड्या ज्यांनी मराठी मनोरंजनविश्व गाजवल्या आहेत, ते पाहूया…
अभिनय बेर्डे व स्वानंदी बेर्डे
आपल्या दमदार अभिनयाने ज्यांनी मराठी चित्रपटसृष्टी गाजवली ते अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे सध्या या जगात नसले, तरी त्यांची मुलं आपल्या वडिलांचा वारसा पुढे नेत आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांना अभिनय व स्वानंदी ही दोन मुलं आहेत. ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून पदार्पण करणारा अभिनय बेर्डे हा चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जातो. तर त्याची बहीण स्वानंदी हीदेखील अभिनयक्षेत्रात कार्यरत असून वडील व भावाप्रमाणे मनोरंजन विश्वात आपला जम बसवत आहे. दोघांचं बॉण्डिंग उत्तम असून ते दोघेही एकमेकांसोबतचे मस्ती करणारे गोड फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात.
अभिषेक देशमुख व अमृता देशमुख
हे देखील वाचा – “माझ्या वडिलांकडे पिस्तुल होतं आणि…”, गश्मीर महाजनीचा वडिलांबाबत मोठा खुलासा, म्हणाला, “पोलिसांनी मला…”
छोट्या पडद्यावरील दोन प्रसिद्ध कलावंतही सक्खे भाऊ-बहीण आहेत. ती म्हणजे ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत यशची भूमिका साकारणारा अभिनेता अभिषेक देशमुख व रिऍलिटी शो ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात झळकलेली अभिनेत्री अमृता देशमुख. अमृता तिच्या भावासाठी अत्यंत जवळची आहे. बिग बॉसच्या घरात असताना भावाची आठवण काढताना अमृता अनेकदा भावुक झालेली पाहायला मिळाली. हे दोघेही एकमेकांसह अनेकदा मजा-मस्ती करताना दिसले. शिवाय, काही गोड आठवणीही त्यांनी सोशल मीडियावर नेहमी शेअर करतात.
शशांक केतकर व दीक्षा केतकर
हे देखील वाचा – ‘सुभेदार’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई, पाच दिवसांमध्ये कमावले इतके कोटी, प्रेक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव
मराठी मालिकाविश्वातील आकर्षित चेहरा म्हणून अभिनेता शशांक केतकरला ओळखला जातो. अनेक नाटक व मालिकेतून शशांकने प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडली आहे. शशांकची बहीण दीक्षा केतकर हीदेखील भावाप्रमाणे अनेक नाटक व मालिकांमध्ये दिसलेली आहे. सोशल मीडियावर दोघेही अनेकदा एकमेकांसोबतचे खोडसर व्हिडिओ किंवा फोटो शेअर करत असतात. (Raksha Bandhan)