रविवार, मे 11, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘OMG २’नंतर अक्षय कुमारच्या आणखी एका बड्या चित्रपटाची घोषणा, प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणार का?

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 17, 2023 | 12:48 pm
in Entertainment
Reading Time: 4 mins read
google-news
Welcome 3 Released Date

Welcome 3 Released Date

विनोदी चित्रपट आणि त्यात साकारलेल्या विनोदी भूमिका प्रेक्षकांना नेहमीच खळखळून हसवतात. बॉलिवूडमध्ये अशा विनोदी चित्रपटाच्या यादीत ‘वेलकम’ चित्रपटाचं नाव आवर्जून घेतलं जातं. २००७ साली प्रदर्शित झालेला हा विनोदी चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला. या चित्रपटाच्या मिम्स आजही प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. २०१५ साली वेलकम चित्रपटाचा सिक्वेल म्हणजेच ‘वेलकम बॅक’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर ‘वेलकम’ चित्रपटाच्या चाहत्यांना चित्रपटाबाबतची उत्सुकता लागून राहिली होती. अशातच नुकतीच चित्रपटाबाबतची एक महत्वाची घोषणा निर्मात्यांनी केली आहे. याबाबतची एक पोस्ट शेअर करत ‘वेलकम ३’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. OMG चित्रपटानंतर अक्षय कुमार ‘वेलकम ३’ चित्रपटामधूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं सांगितलं जात आहे.(Welcome 3 Released Date)

‘वेलकम’ चित्रपटाच्या पहिल्या भागात नाना पाटेकर, अनिल कपूर, परेश रावल, अक्षय कुमार यांसारख्या प्रसिद्ध कलाकार महत्वाच्या भूमिकेत होते. चित्रपटात नाना पाटेकर यांनी साकारलेली विनोदी भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर ‘वेलकम बॅक’ चित्रपटात जॉन अब्राहम व श्रृती हसन हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते.

वाचा – ‘वेलकम ३’ कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला? (Welcome 3 Released Date)

FIROZ A NADIADWALA LOCKS CHRISTMAS 2024 FOR ‘WELCOME 3’… #WelcomeToTheJungle is the title of the third instalment of #Welcome franchise… Producer #FirozANadiadwala has decided to bring the family entertainer in #Christmas2024.

It may be recalled that the producer had released… pic.twitter.com/oPUJwqT2wH

— taran adarsh (@taran_adarsh) August 16, 2023

आणखी वाचा – मराठमोळ्या अभिनेत्रींमध्ये ऐश्वर्या नारकर शिक्षणात अव्वल, स्वतःच सांगितलं किती झालं आहे शिक्षण?

या दोन्ही चित्रपटानंतर ‘वेलकम’ चित्रपटाच्या पुढील भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. लवकरच या चित्रपटाचा नवीन भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श याने एक पोस्ट शेअर करत या चित्रपटाची घोषणा केली. २०२४च्या नाताळला हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं पोस्टमध्ये सांगितलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

आणखी वाचा – ११वेळा ऑपरेशन्स, गंभीर आजार, हाडांची मोडतोड अन्…; सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्याची झालीय अशी अवस्था, म्हणाले, “मृत्यूशी लढाई…”

चित्रपट समीक्षक तरण आदर्श याने सोशल मीडियावर पोस्ट केली,“ फिरोज ए नाडियादवाला यांनी वेलकम ३ चित्रपटासाठी ख्रिसमस २०२४ हा मुहुर्त ठरवला आहे. ‘वेलकम’ फ्रँचायझीच्या तिसऱ्या चित्रपटाचं नावं ‘वेलकम टू द जंगल’ असून निर्माता फिरोज ए नाडियादवाला यांनी २०२४च्या ख्रिसमसला हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.”

या चित्रपटात कोणते कलाकार काम करणार आहेत, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे. ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटात अक्षय कुमार, अरशद वारसी आणि संजय दत्त हे दिसणार असल्याची चर्चा आहे. ‘वेलकम’ चित्रपटाच्या दोन्ही भागांचं दिग्दर्शन अनीस बज्मी यांनी केलं होतं. आता तिसऱ्या भागाचं दिग्दर्शन अहमद खान करणार आहेत.

Tags: akshay kumarbollywood actorbollywood gossipbollywood movienana patekarnew movie
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Kitchen Hacks
Lifestyle

Kitchen Tips : जेवण बनवताना खूपच तारांबळ होते?, मधुराच्या ‘या’ सोप्या टिप्स ठरतील फायदेशीर

मे 11, 2025 | 5:00 pm
Marathi actor chetan dalvi journey
Entertainment

ब्रेनस्ट्रोक, इंडस्ट्रीला विसर अन्…; मराठी सुप्रसिद्ध अभिनेत्याचा सगळ्यात वाईट काळ, आता दिसतात असे

मे 11, 2025 | 1:00 pm
Mumbai Shocking News
Women

अश्लील व्हिडीओ दाखवून आठ वर्षाच्या मुलीचे कपडे काढणारा ‘तो’ जिवंत राक्षस

मे 11, 2025 | 10:00 am
Hina Khan Received Threats
Entertainment

धर्म, पाकिस्तान अन् त्रास; मुस्लिम म्हणून हिना खानला थेट धमक्या, म्हणाली, “सीमेपलीकडील लोकांवरही प्रेम केलं पण…”

मे 10, 2025 | 6:17 pm
Next Post
Nik Jonas Falls

Video : …अन् कॉन्सर्टदरम्यान गात असताना स्टेजवरच पडला निक जोनास, प्रियांकासह सासूबाईही परफॉर्मन्स बघत होत्या आणि…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.