रविवार, मे 11, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“ऐकल नाही तर राडा होणारच”, सीमा हैदरला सिनेसृष्टीत एंट्री देण्यावरून मनसे नेते अमेय खोपकर यांचा संताप, म्हणाले, “हे असले तमाशे…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 13, 2023 | 10:16 am
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Amey khopkar On Seema Haider

Amey khopkar On Seema Haider

सोशल मीडियावर नेहमीच जगभरात घडलेल्या काही ना काही नवनवीन गोष्टी कानावर पडतात. अशातच काही दिवसांपूर्वी प्रियकरासाठी थेट पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरने साऱ्यांना धक्काच दिला. पाकिस्तानातून भारतात आलेल्या या सीमा हैदरच प्रकरण आता सिनेसृष्टीसोबत जोडलं गेलं आहे. सीमा हैदर व सचिन मीणा यांच्या प्रेमकहाणीची सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. (Amey khopkar On Seema Haider)

जगभरात या दोघांची चर्चा असतानाच आता या दोघांनी त्यांना काम मिळत नसल्याचा सपाटा लावला आहे. अशातच या दोघांवर आधारित चित्रपट येणार असल्याचं समोर आलं आहे. ‘कराची टू नोएडा’ असं या चित्रपटाचं नाव असून हा चित्रपट जानी फायरफॉक्सचे मॅनेजिंग डायरेक्टर अमित जानी हे निर्मित करणार आहेत. याबाबतची माहिती ८ ऑगस्टला त्यांनी दिली होती. त्यानंतर आता चित्रपटासाठी ऑडिशन सुरू झाल्याचं समोर आलं आहे.

याशिवाय सीमा हैदरला एका चित्रपटाची ऑफरही देण्यात आली आहे. राजस्थानमधील उदयपूर येथील शिंपी कन्हैया लालच्या हत्येवर ‘ए टेलर मर्डर स्टोरी’ चित्रपट बनवण्यात येणार आहे. या चित्रपटात सीमा हैदर भारतीय रॉ एजंटची भूमिका साकारताना दिसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, गेल्याच आठवड्यात या चित्रपटासाठी सीमाने ऑडिशनदेखील दिल्याचं समोर आलं आहे.

पाहा अमेय खोपकरांनी सीमा हैदरविरोधात काय ट्विट केलं (Amey khopkar On Seema Haider)

या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी यावर भाष्य करत ट्विट केलं आहे. असला कोणताही प्रकार महाराष्ट्रात खपवून घेतला जाणार नाही याबद्दल ते स्पष्टच बोलले आहेत. याबरोबरच पाकिस्तानी लोकांच्या चित्रपटसृष्टीत काम करण्यावरही त्यांनी भाष्य केलं आहे.

हे देखील वाचा – नितिन देसाईंना श्रद्धांजली वाहताच ट्रोल झालेल्या गश्मीर महाजनीने नेटकऱ्याला दिलं सडेतोड उत्तर, म्हणाला, “तुम्ही खूप…”

अमेय खोपकर यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “पाकिस्तानी नागरिकाला भारतीय चित्रपटसृष्टीत कोणतंही स्थान असता कामा नये, या आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. सीमा हैदर ही पाकिस्तानी महिला सध्या भारतात आहे. ती ISI एजंट आहे अशा बातम्याही पसरल्या होत्या. आमच्या इंडस्ट्रीमधील काही उपटसुंभ प्रसिद्धीसाठी त्याच सीमा हैदरला अभिनेत्री बनवतायत. देशद्रोही निर्मात्यांना लाजा कशा वाटत नाहीत? हे असले तमाशे ताबडतोब बंद करा, नाहीतर मनसेच्या धडक कारवाईसाठी तयार रहा, असा जाहीर इशारा देतोय. ऐकल नाही तर राडा तर होणारच..!!”

पाकिस्तानी नागरिकाला भारतीय चित्रपटसृष्टीत कोणतंही स्थान असता कामा नये, या आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. सीमा हैदर ही पाकिस्तानी महिला सध्या भारतात आहे. ती ISI एजंट आहे अशा बातम्याही पसरल्या होत्या. आमच्या इंडस्ट्रीमधील काही उपटसुंभ प्रसिद्धीसाठी त्याच सीमा हैदरला अभिनेत्री…

— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) August 12, 2023

हे देखील वाचा – ‘या’ कारणांमुळे वैभव मांगले यांनी सोडले ‘अलबत्या गलबत्या’ नाटक, खुलासा करत म्हणाले, “जेव्हा नाटक सोडायचा विषय निघतो…”

सीमा हैदर या प्रकरणावर आता मनसेने विशेष लक्ष घातल्याने याची जोरदार चर्चा सर्वत्र रंगली आहे. अमेय खोपकर यांनी याबाबत केलेल्या ट्विटनंतर कोणती हालचाल होणार का याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहील आहे.

Tags: amey khopkarmaharshtra navnirman senamansemnsseema haider
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Marathi actor chetan dalvi journey
Entertainment

ब्रेनस्ट्रोक, इंडस्ट्रीला विसर अन्…; मराठी सुप्रसिद्ध अभिनेत्याचा सगळ्यात वाईट काळ, आता दिसतात असे

मे 11, 2025 | 1:00 pm
Mumbai Shocking News
Women

अश्लील व्हिडीओ दाखवून आठ वर्षाच्या मुलीचे कपडे काढणारा ‘तो’ जिवंत राक्षस

मे 11, 2025 | 10:00 am
Hina Khan Received Threats
Entertainment

धर्म, पाकिस्तान अन् त्रास; मुस्लिम म्हणून हिना खानला थेट धमक्या, म्हणाली, “सीमेपलीकडील लोकांवरही प्रेम केलं पण…”

मे 10, 2025 | 6:17 pm
Soldier Viral Video
Social

जवानांना पाहताच चिमुकलीने केला नमस्कार, सॅल्युट करायचं विसरली म्हणून पुन्हा आली अन्…; Video व्हायरल

मे 10, 2025 | 5:11 pm
Next Post
Aai Kuthe Kay Karte Serial Troll

'आई कुठे काय करते' मालिकेतील घटस्फोटाच्या कथानकावरून प्रेक्षकांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, "कथेच्या नावाने बोंब…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.