बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जयाप्रदा यांना एका प्रकरणात चेन्नईच्या न्यायालयाने ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. शिवाय ५ हजारांचा दंडही ठोठावला आहे. चेन्नईच्या रायपेटामधील जयाप्रदा यांच्या मालकीच्या चित्रपटगृहातील कर्मचाऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने हा निकाल दिला आहे. (Bollywood Actress Jayaprada)
अभिनेत्री जयाप्रदा यांच्या मालकीचे असलेले ‘जयाप्रदा थिएटर कॉम्प्लेक्स’ हे चित्रपटगृह चेन्नईचे राम कुमार आणि राजा बाबू चालवतात. त्यावेळी त्यांनी या चित्रपटगृहात काम करणाऱ्या कामगारांकडून ईएसआयचे पैसे गोळा केले होते. मात्र, हे पैसे कामगारांना देण्यास अपयशी ठरल्याने ही समस्या सुरु झाली व त्यांनी चित्रपटगृह व्यवस्थापनाविरोधात न्यायालयात धाव घेतली. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर, अभिनेत्रीने कर्मचार्यांना पूर्ण रक्कम देण्याचे आश्वासन दिले आणि हा खटला फेटाळण्याची विनंती केली होती.
हे देखील वाचा – बहुचर्चित व वादग्रस्त ‘आदिपुरुष’ अखेर ओटीटी फ्लॅटफॉर्मवर प्रदर्शित, कुठे पाहता येणार?
मात्र, कामगार सरकारी विमा महामंडळाच्या वकिलांनी जयाप्रदा यांच्या अपिलावर आक्षेप घेतला. त्यानंतर या प्रकरणाशी संबंधित जयाप्रदा यांच्यासह आणखी तीन जणांना ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
हे देखील वाचा – वत्सल-इशिताच्या मुलाचं नाव ठरलं, बारशाचा व्हिडीओही केला शेअर, मुलाच्या नावाचं सोनम कपूरच्या लेकाशी कनेक्शन
Egmore court sends popular actress Jayaprada to six months in jail and imposes a fine of Rs 5,000 in connexion with the ESI payment of employees of a movie theatre. The theatre is run by Ram Kumar and Raja Babu, from Chennai.#Jayaprada #ESI #entertainment pic.twitter.com/TVbDeiveh4
— NewsFirst Prime (@NewsFirstprime) August 11, 2023
अभिनेत्री जयाप्रदा यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात तेलुगू चित्रपटांतून केली आहे. तरुण वयात दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये लोकप्रियता मिळवल्यानंतर जयाप्रदा यांनी १९७९ मध्ये प्रदर्शित झालेल्या सरगम चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. जयाप्रदा यांनी आपल्या ३ दशकांच्या कारकिर्दीत हिंदी, तेलगू, तामिळ, मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, कारकिर्दीच्या सर्वोच्च शिखरावर असताना जयाप्रदा यांनी चित्रपटसृष्टी सोडली आणि राजकारणात प्रवेश केला. (Bollywood Actress Jayaprada Arrest)