छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. या कार्यक्रमाने आजवर रसिक प्रेक्षकांच्या मनात स्वतःच स्थान निर्माण केलं. नुकतीच या मालिकेला १५ वर्षे पूर्ण झाली आहेत. ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेपैकी एक आहे. चाहत्यांच्या पसंतीच्या यादीत ही मालिका अव्वल स्थानावर आहे. या मालिकेतील कलाकारांचे लाखो चाहते दिवाने आहेत. (Dilip Joshi Fees)
या मालिकेतील मुख्य पात्र म्हणजे जेठालाल गढा. अभिनेते दिलीप जोशी गेली १५ वर्षे ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. दिलीप जोशी यांनी या मालिकेद्वारे इंडस्ट्रीत स्वतःच एक स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेमधून दिलीप जोशी किती कमाई करतात, याबद्दलची माहिती समोर आली आहे.
पाहा जेठालाल गढा यांचं मानधन नेमकं किती आहे (Dilip Joshi Fees)
दिलीप जोशी यांनी आपल्या अभिनय कौशल्याने मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. त्यांच्या अभिनयाने मालिकेला नेहमीच रंजक वळण आलेलं पाहायला मिळतं. दिलीप जोशी यांनी त्यांच्या कमाईबद्दल India.com ला माहिती दिली, दिलीप जोशी प्रति एपिसोड १.५ लाख रुपये घेतात. दरम्यान ते या मालिकेत सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते आहेत.
दिलीप जोशी यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे. सलमान खानच्या चित्रपटातही त्यांनी भूमिका साकारली आहे. सलमान खानच्या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातून त्यांनी करिअरची सुरुवात केली. याशिवाय त्यांनी ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’ व ‘हम आपके है कौन’ या चित्रपटांतही काम केलं.

चित्रपटांसोबतच त्यांनी छोटा पडदा ही गाजवला. ‘कभी ये कभी वो’, ‘हम सब एक है’ यांसारख्या मालिकांमध्ये ते दिसले होते. मात्र, त्यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली ती ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेमुळेच. या मालिकेतील त्यांच्या दयासोबतच्या आंबट गोड नात्यापासून ते जिलेबी फाफड्यावर प्रेम करण्यापासून तसेच बापूजींना आदर देण्यापासून ते आत्माराम भिडे यांच्याशी भांडण करण्यापर्यंत, जेठालालची भूमिका ही मनोरंजनाने परिपूर्ण अशी आहे.