अभिनेत्री क्रांती रेडकर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावरील तिचे रील्सही चाहत्यांच्या नेहमीच पसंतीस उतरतात. याशिवाय क्रांती रेडकर तिच्या पतीसोबतच्या अनेक व्हिडिओंमुळे चर्चेत असते. क्रांतीचे पती समीर वानखेडे हे केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाच्या मुंबई विभागाचे माजी संचालक म्हणून कार्यरत होते. दरम्यान त्यांच्यासोबतच्या अनेक वादग्रस्त चर्चांमुळे ते आणि क्रांतीही मध्यंतरी चर्चेत होती. सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणाऱ्या क्रांती कायमचं तिच्या जुळ्या मुलींचे अनेक व्हिडीओ शेअर करत असते. (Kranti Redkar Daughters)
क्रांती कायमच तिच्या जुळ्या मुलींच्या बऱ्याच गोष्टी सांगताना दिसते. त्यांचे पाठमोरे व्हिडीओ ती नेहमीच शेअर करत असते. अद्याप क्रांतीने त्यांच्या मुलींचे चेहरे कुणासमोर आणलेले नाही आहेत. अशातच क्रांतीचे पती समीर वानखेडे यांनी ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. दरम्यान त्यांनी त्यांच्या जुळ्या मुलींच्या नावामागील रहस्य उघडले. क्रांती आणि समीर यांच्या जुळ्या मुलींचं नाव झिया आणि झिदा आहे. या त्यांच्या हटके नावांमागील नेमकं रहस्य काय आहे याबद्दल समीर यांनी सांगितलं.
पाहा क्रांतीच्या मुलांच्या नावामागची गोष्ट काय आहे (Kranti Redkar Daughters)
झिदाचं नाव हे समीर यांच्या आईच्या नावावरून ठेवण्यात आल्याचा खुलासा त्यांनी केला. त्यांच्या आईचं नाव झायदा असं आहे. तर, झियाचं नाव समीर यांच्या आत्याच्या नावावरून ठेवलंय. याबाबत सांगताना ते म्हणाले की, “आत्याला कॅन्सर झाला होता आणि माझं आत्यावर खूप प्रेम होतं, त्यामुळे तिच्या नावावरून मुलीचं नाव ठेवलं,” असं समीर म्हणाले.
२०१८ साली क्रांतीने तिच्या जुळ्या मुलींना जन्म दिला. आता त्या दोघी ५ वर्षांच्या आहेत. झिया आणि झिदाचे अनेक मजेशीर व्हिडीओ ती सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असते. आणि त्यांचे हे व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस ही पडताना दिसतात.