Friendship Day Special : कलाकार हा केवळ एखाद्या चित्रपट, नाटक किंवा मालिके पर्यंत मर्यादित राहत नाही. त्याचा अभिनय त्याला प्रेक्षकांच्या मनात कायम संग्रहित ठेवतो. मराठी चित्रपट सृष्टीतील मित्रांची अशीच एक लाडकी जोडी म्हणजे अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे. मराठी चित्रपट सृष्टी बहारदार बनवणाऱ्या कलाकारांपैकी ही दोन नावं महत्वाची मानली जातात. केवळ पडद्यावरच नाही तर खऱ्या आयुष्यात ही अशोक सराफ व लक्ष्मीकांत बेर्डे यांची मैत्री चांगलीच प्रसिद्ध होती.(Ashok Saraf on Laxmikant Berde)
एकमेकांच्या कामाबाबत ही दोघे एकमेकांना तेवढाच आदर द्यायचे. मैत्री आणि काम कस जपावं याच एक उत्तम, उदाहरण पाहायला मिळत अशोक सराफ व लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या धुमधडाका या चित्रपटातील शूटिंग दरम्यानच्या किस्स्यामधून. हा किस्सा अशोक सराफ यांनी त्यांच्या ‘बहुरुपी’ या आत्मचरित्रात लिहून ठेवला आहे.
हे देखील वाचा – ‘महेश महेश…लक्ष्या मी आलोच’ महेश कोठारेंचा हा फॉर्मुला न वापरल्यामुळे ‘या’ चित्रपटाला आलं होत अपयश…
आणि मामांना नाईलाजाने दिग्दर्शकाचं ऐकावं लागलं(Ashok Saraf on Laxmikant Berde)
अशोक सराफ व लक्ष्मीकांत यांचा धुमधडाका हा चित्रपट विशेष गाजला. अभिनेते महेश कोठारे,अभिनेते शरद तळवलकर, अभिनेत्री निवेदिता सराफ अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात होती. अशातच अशोक सराफ यांनी किस्सा शेअर करत सांगितलं “लक्ष्या बापाला (शरद तळवलकरांना) हॉरर चित्रपटाची कथा ऐकवत असतो मूळ चित्रपटात या सीन मध्ये बाप आणि मुलगा दोघेच आहेत त्यामुळे या सीन मध्ये ही बाप आणि मुलगा दोघेचं हवेत. याच कारण असं कि बाप आणि मुलगा दोघेचं असतील तर बाप घाबरेल सोबत आणखी कोण असेल तर बाप का घाबरेल? त्यामुळे माझी तिथे गरज न्हवती.(ashok saraf laxmikant berde dhumdhadaka)

हे देखील वाचा-आणि लक्ष्मीकांत निवेदिता सराफ यांना म्हणाले ’बाई, एक लक्षात ठेव, तू चुकीचा सराफ शोधलास’
पण महेश कोठारेंनी अशोक सराफ यांना आग्रह केला आणि त्या सीन मध्ये अशोक सराफ दिसले यावेळी अशोक सराफ यांनी पुढे लिहिलंय “मी शरद तळवलकरांना म्हणालो देखील ‘शरदकाका हा सीन लक्षाचा आहे, त्याचं क्रेडिट त्याला मिळूदे, मी मध्ये असताच कामा नये”. आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी धुमधडाका मधला तो सीन चांगला, गमतीदार पद्धतीने रंगवला देखील.