शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आधी गर्भपात, पुन्हा गरोदर अन्…; दुसऱ्यांदा आई होणाऱ्या गौहर खानला रडू कोसळलं, अशी हालत होती की…

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 2, 2025 | 1:34 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Gauahar Khan miscarriage

आधी गर्भपात, पुन्हा गरोदर अन्...; दुसऱ्यांदा आई होणाऱ्या गौहर खानला रडू कोसळलं

मुलाल जन्म देणं म्हणजे स्त्रीचा दुसरा जन्मच हे वाक्य प्रत्येकवेळी कानी पडतं. आई होण्याचा अनुभव ज्या स्त्रीने घेतला तिच खऱ्या अर्थाने हे वाक्य जगली. आई झाल्यानंतर काम, मुल सांभाळणं म्हणजे तारेवरची कसरतच. मुलाला जन्म देण्यापर्यंतचा प्रत्येक स्त्रीचा प्रवास हा वेगळाच असतो. बऱ्याचदा काही स्त्रियांना मिसकॅरेजचाही सामना करावा लागतो. आता यामागे अनेक शारीरिक, मानसिक कारणंही असतात. असाच एक प्रसंग सुप्रसिद्ध अभिनेत्री गौहर खानच्याही वाट्याला आला. गौहर लवकरच दुसऱ्यांदा आई होणार आहे. पण त्यापूर्वी तिला गर्भपाताचा सामना करावा लागला. याबाबत तिने नुकतंच तिच्या एका व्लॉगद्वारे सांगितलं. तसेच हा संपूर्ण काळ किती कठीण होता याविषयीही गौहरने भाष्य केलं. (Gauahar Khan miscarriage)

२०२३मध्ये गौहरने एका सुंदर मुलाला जन्म दिला. गौहरने त्याचं नाव जेहान ठेवलं. पण जेहानच्या जन्मापूर्वीच तिचा गर्भपात झाला. याचविषयी तिने उघडपणे सांगितलं. हा संपूर्ण प्रवास सांगताना तिला रडूनही कोसळलं. पहिल्यांदाच गरोदर राहिल्यानंतर गौहरचा पती जैद दरबारही खूप खुश होता. मात्र नशिबात काही वेगळंच लिहून ठेवलं होतं. गरोदर राहिल्यानंतर ९ आठवडे उलटून गेले. त्यानंतर गौहरला गर्भपाताचा सामना करावा लागला.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचं ४०शीमध्येच धक्कादायक निधन, बसने प्रवास करतानाच मृत्यूने कवटाळलं अन्…

हा काळ तिच्यासाठी खूपच अवघड होता. गर्भपाताबाबत तिने कोणालाही सांगितलं नाही. गरोदरपणाच्या नऊ आठवड्यानंतर बाळाला गमावणं गौहरच्या पचणी पडेना. कित्येक दिवस ती या संपूर्ण घटनेमधून बाहेरच पडली नाही. गौहर म्हणाली, “एक गोष्ट आहे जी मी अजूनही कोणालाच सांगितली नाही. मी अगदी हिंमत करुन विचारपूर्वक हे बोलत आहे. जेहानला जन्म देण्यापूर्वी माझा एक गर्भपात झाला होता”.

आणखी वाचा – आईचं निधन, पाकिस्तानने अंत्यसंस्कारालाही येऊ दिलं नाही अन्…; अदनान सामीने सांगितला ‘तो’ काळ, भारताने दया दाखवली पण…

पुढे ती म्हणाली, “हा संपूर्ण प्रसंग मी शब्दांत व्यक्तच करु शकत नाही. गरोदर राहिल्यानंतर नऊ आठवड्यांनी माझ्याबरोबरही ही घटना घडली. यामधून मला बाहेर पडणं खूपच कठीण गेलं. ते दुःख अजूनही मी सांगताना अंगावर काटा येतो. नैसर्गिकरित्याच मी दुसऱ्यांदा गरोदर राहिले. जेहान मी अल्लाहने दिलेला आर्शिवाद मानते”. गौहरचं २०२०२मध्ये अगदी थाटामाटात लग्न झालं. आता ती लवकरच दुसऱ्यांचा आई होण्याचं सुख अनुभवणार आहे.

Tags: bollywood newsentertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
 Heeramandi Actress Sharmin Segal

'हिरामंडी' फेम अभिनेत्री झाली आई, गोंडस मुलाला दिला जन्म, कुटुंबात जंगी सेलिब्रेशन

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.