Kirit Somaiya on Nitin Desai: सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येचे वृत्त २ ऑगस्ट रोजी समोर आले आणि त्यानंतर सिनेसृष्टीसह राजकारणी देखील हळहळले. त्यांनी अनपेक्षितपणे उचलले हे पाऊल धक्कादायक होते.नितीन देसाई यांनी उभारलेल्या एन. डी. स्टुडिओमध्येच आत्महत्या केली आहे.त्यांच्या आत्महत्येविषयी अनेक चर्चांना उधाण आले आहे.(Kirit Somaiya on Nitin Desai)
नितीन देसाई यांचे कुटुंब भारताबाहेर असल्याने त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. नितीन देसाई यांचा सिनेसृष्टीसह राजकीय क्षेत्रातही चांगला वावर होता. कलाकारांसोबतच राजकीय नेत्यांनी देखील नितीन देसाई यांच्या अंतिमदर्शनासाठी हजेरी लावली. यांपैकी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नितीन देसाईं बाबत मनोगत व्यक्त केलं आहे. (Nitin Desai Funeral Updates)
पाहा काय म्हणाले किरीट सोमय्या? (Kirit Somaiya on Nitin Desai)
किरीट सोमय्या म्हणाले,”एक मुलुंडकर स्वतःची एक सृष्टी उभी केली आणि ती सृष्टी सोडून तो आज निघून गेला.मुलुंडकरबद्दल मला अभिमान आहे.एका तरुणाने मुलुंड, मुंबई,महाराष्ट्राचं नाव देशात,जगात रोशन केलं.खूप वाईट वाटत आहे. काही महिन्यांपूर्वी इथेच नितीनच्या कुटुंबातील एका लग्नासाठी आलो होतो.आणि आज या दुःखद घटनेत सहभागी व्हावं लागत आहे.याच फार दुःख वाटत आहे”.

हे देखील वाचा : नितीन देसाईंच्या ‘एनडी स्टुडिओ’वर २५२ कोटींचं कर्ज, ‘एडलवाईस एआरसी’ने थकबाकीचा अहवाल आणला समोर
नितीन देसाई यांच्या मृत्यूचं कारण अजून समोर आलेलं नाही. तरी काही वृतांनुसार असं म्हंटल जात आहे की, नितीन देसाई हे आर्थिक विवंचनेत होते. तर त्यांची आर्थिक परिस्थिती दर्शवणारा एक अहवाल ‘इकॉनॉमिक टाइम्स’ने सादर केला आहे. त्यानुसार नितीन देसाई यांच्या कंपनीवर एकूण २५२ कोटी रुपयांची थकबाकी होती. आणि त्या अंतर्गत एनसीएलटीच्या मुंबई खंडपीठाने २५ जुलै २०२३ रोजी नितीन देसाई यांची कंपनी ‘ND’s Art World Private Limited ‘ विरुद्ध दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले होते.