Dipika Kakar Liver Tumor : दीपिका कक्कर सध्या शारीरिक त्रासामुळे हैराण आहे. काही दिवसांपूर्वीच दीपिकाबाबत एक धक्कादायक बाब समोर आली. तिच्या लिव्हरमध्ये ट्युमर झाला असल्याचं समोर आला. दीपिका व शोएब इब्राहिमनेच याबाब माहिती दिली. सध्या दीपिकावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. दीपिका व शोएब त्यांच्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट व्लॉग शूट करत चाहत्यांपर्यंत पोहोचवतात. त्यांच्या युट्युब चॅनलद्वारे मनातील व्यथा मांडतात. आताही शोएबने एक व्लॉग केला आहे. या व्लॉगद्वारे त्याने पत्नी दीपिकाबाबत सगळं काही सांगितलं. तसेच तिच्या निरोगी आरोग्यासाठी तुम्ही प्रार्थना करा असंही शोएबने म्हटलं. सध्या दीपिका बऱ्याच त्रासातून जात आहे. याचविषयी शोएब नक्की काय म्हणाला? हे जाणून घेऊया. (Dipika Kakar tumor in liver)
दीपिका व शोएब सोशल मीडियावर बरेच सक्रिय आहेत. आताही वाईट प्रसंगामध्ये दोघांनाही सगळ्यांची साथ हवी आहे. दीपिकाला बराच त्रासही होत आहे. शिवाय तिला पोटामध्ये वेदना होत आहेत. सर्जरी करण्याची वेळ दीपिकावर आली आहे. या सगळ्या प्रसंगामध्ये शोएब व कुटुंबिय दीपिकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. आता दीपिका नक्की कोणत्या परिस्थितीमध्ये आहे याविषयी शोएबने व्हिडीओच्या माध्यमातून स्पष्ट केलं.
शोएब म्हणाला, “लिव्हरच्या डाव्या बाजूला दीपिकाला ट्युमर आहे. हा ट्युमर आकारानेही खूप मोठा आहे. दीपिका अजिबात ठिक नाही. तिच्या पोटामध्ये बरीच गडबड सुरु आहे. आणि ही समस्या खूपच गंभीर आहे. मी चंदीगडमध्ये होतो. दीपिका मुंबईमध्येच होती. दरम्यान तिच्या पोटामध्ये दुखू लागलं. दीपिकाला वाटलं की, ही पोटदुखी आहे तर इतकं काही होणार नाही. मात्र वेदना वाढतच गेल्या. शेवटी डॉक्टरांकडे दीपिकाला जावं लागलं”.
आणखी वाचा – १८व्या वर्षातच लग्न, घटस्फोट, बॉयफ्रेंडचीही पाठ; आता कामासाठी वणवण फिरतेय सुप्रसिद्ध अभिनेत्री, ओळखणंही कठीण
पुढे तो म्हणाला, “डॉक्टरांकडे गेल्यानंतर दीपिकाने सगळा प्रकार सांगितला. काही तपासण्या करण्यात आल्या. त्यानंतर समोर आलं की, दीपिकाच्या पोटामध्ये कसलं तरी इन्फेक्शन झालं आहे. डॉक्टरांनी आम्हाला पुन्हा बोलावलं. सिटीस्कॅन करण्याचा सल्ला दिला. या रिपोर्ट्समध्ये समोर आलं की, दीपिकाच्या लिव्हरमध्ये ट्युमर आहे. टेनिस बॉलच्या आकाराचा हा ट्युमर आहे. हे सगळं कळल्यानंतर आम्हाला मोठा धक्काच बसला. हा कॅन्सर तर नाही ना अशी भिती आम्हाला होती. मात्र तसं काही नसल्याचं सध्यातरी डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे. अजूनही काही तपासण्या बाकी आहेत”. शोएबला लेक रुहानचीही चिंता आहे. कारण दीपिका त्याला फिडींग करते. मात्र आता बाहेरच दूध त्याला द्यावं लागत आहे. तरीही रुहानला सतत आईची आठवण येत आहे. शोएब ही संपूर्ण परिस्थिती सांगताना हतबल झाला होता.