बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या कामाचे लाखो प्रेक्षक दिवाने आहेत. त्याला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. प्रत्येक चित्रपट आणि त्यामधील भूमिकेच्या तयारीसाठी आमिर अधिकाधिक वेळ घेतो. हिच आमिरची खासियत आहे. आता त्याचा ‘तारे जमिन पर’ चित्रपटही प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. कामाबरोबरच आमिर त्याच्या खासगी आयुष्यामुळे अधिकाधिक चर्चेत असतो. दोन वेळा घटस्फोट झाल्यानंतर तो आता एकट्याने आयुष्य जगत आहे. मात्र दुसरी पूर्वाश्रमीची पत्नी किरण रावसह आमिर अनेकदा एकत्र दिसतो. एकट्यानेच राहण्याचा निर्णय घेतला असताना आमिरच्या नव्या रिलेशनशिपची जोरदार चर्चा सुरु झाली. याचसंदर्भातील एक व्हिडीओ आता समोर आला आहे. (aamir khan gf gauri airport video)
२०२५मध्ये आमिरचा ६०वा वाढदिवस दणक्यात साजरा झाला. यावेळी त्याने त्याच्या रिलेशनशिपबाबत सगळ्यांना सांगितलं. नवभारत टाइम्सच्या वृत्तानुसार, आमिरने त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटला जगजाहिर केलं. तो सध्या गौरीला डेट करत आहे. आता एका व्हिडीओद्वारे पुन्हा एकदा आमिरच्या रिलेशनशिपचं सत्य समोर आलं आहे. आमिरचा मुंबई विमानतळावरचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
आणखी वाचा – “भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”
गर्लफ्रेंड गौरी आमिरला विमानतळावर भेटण्यासाठी आली होती. आमिरसाठी बहुदा हे सरप्राइज होतं. आमिरने यावेळी कुर्ता व धोती परिधान केली होती. गौरी आधीच गाडीमध्ये बसली होती. आमिर येताच दोघांमध्ये बोलणं सुरु झालं. पापाराझींनी हे संपूर्ण क्षण कॅमेऱ्यात कैद केंनी हे संपूर्ण क्षण कॅमेऱ्यात दले. यावेळी आमिरच्या एका व्हिडीओने सगळ्यांच्याच भूवया उंचावल्या आहेत.
आणखी वाचा – Video : साडीचा पदर खेचला, खाली पाडलं अन्…; महिलेवर माकडांचा विचित्र हल्ला, अशी परिस्थिती केली की…
आमिरने गर्लफ्रेंडच्या खांद्यावर डोकं ठेवलं. यानंतर अनेक चर्चा रंगल्या. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनीही विविध कमेंट केल्या. अनेकांनी आमिरला ट्रोल केलं. गर्लफ्रेंडचा कुर्ता परिधान केला का?, आता गर्लफ्रेंड करणं गरजेचं होतं का?, आम्ही याला ओळखत नाही अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.