TV Actor Karan Hukku : हिंदी टीव्ही इंडस्ट्रीतला प्रसिद्ध अभिनेता करण हुक्कू अडचणीत सापडला आहे. या टीव्ही अभिनेत्याने आपलं घड्याळ ब्रॅण्डेड असल्याचं सांगत तब्बल ७ लाख रुपयांना विकलं. मात्र जेव्हा ते घड्याळ त्या ब्रॅण्डचं नसल्याचं लक्षात आलं, तेव्हा त्याच्या विरोधात तातडीने पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. अभिनेत्याने या प्रकरणी मौन धरलं असून त्याने यावर कोणतीही प्रतिक्रिया किंवा स्पष्टीकरण दिलं नाही. (tv actor karan hukku selling duplicate watch)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता करण आणि निर्माता मोहम्मद सलीम अब्दुल कुद्दूस फारुकी यांची भेट 2016 मध्ये एका जिममध्ये झाली होती. ते जवळपास 7 वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. त्यावेळी करण हुक्कूने आपलं घड्याळ ब्रॅण्डेड असल्याचं सांगत ते घड्याळ निर्मात्याला 7 लाखांना विकलं. मात्र जेव्हा ते घड्याळ ब्रॅण्डेड नसल्याचं समोर येताच आपली फसवणूक झाल्याचे निर्मात्याच्या लक्षात आले.
हे देखील वाचा – “केवळ ५०० रुपयात काम ते उत्कृष्ट कॉमेडियन”,पाहा कसा आहे अभिनेता सुनील ग्रोव्हरचा संपूर्ण जीवन प्रवास
त्यानंतर निर्मात्याने तातडीने ओशिवारा पोलीस स्टेशन गाठत याप्रकरणी अभिनेता करण हुक्कूविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी तक्रारीची शहानिशा करून अखेर आझाद मैदान पोलिसांकडून करण हुक्कूवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी चौकशी करत असून आरोपी अभिनेता करण हुक्कूने मौन बाळगत प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.
हे देखील वाचा – सुपरस्टार रजनीकांतच्या ‘जेलर’चा ट्रेलर आला समोर, अभिनेत्याचा अॅक्शनपॅक अंदाज पाहून चाहते खुश
अभिनेता करण हुक्कूने ‘क्या लव्ह स्टोरी है’, ‘ट्रिक’. ‘सजदा तेरे प्यार में’, ‘तेरा मुझे है पहले का नाता कोई’, आणि ‘घर की लक्ष्मी बेटियां’सह अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे.