भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने सोमवारी (१२ मे) महत्त्वपूर्ण घोषणा केली. त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं सोशल मीडियाद्वारे जाहिर केलं. १४ वर्ष कसोटी क्रिकेट खेळल्यानंतर विराटने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. विराटच्या या निर्णयानंतर अनेकांच्या भूवया उंचावल्या. १४ वर्ष कसोटी क्रिकेट खेळल्यानंतर दहा हजार धावा पूर्ण करण्याचं विराटचं स्वप्नही अपूर्णच राहिलं. त्याने अचानक असा निर्णय का घेतला? असा प्रश्न सातत्याने सोशल मीडियाद्वारे विचारला जात आहे. अशातच आता विराट व अनुष्का शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. किसोटी सामन्यांमधून निवृत्ती घेतल्यानंतर दोघंही प्रेमानंद महाराजांच्या दर्शनाला पोहोचले. (Anushka sharma virat kohli meet premanand ji maharaj)
कसोटी सामन्यांमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहिर केल्यानंतर विराट कुटुंबियांना अधिकाधिक वेळ देत आहे. महत्त्वाच्या निर्णयानंतर विराट पत्नी या निर्णयानंतर विराट प्नाट प्नीअनुष्काला घेऊन प्रेमानंद महाराजांच्या आश्रममध्ये पोहोचला. आश्रममध्ये जाताच प्रेमानंद महाराजांनी त्याला विचारलं की, “प्रसन्न आहेस का?”. यावर विराटने उत्तर दिलं की, “ठिक आहे”. त्यानंतर प्रेमानंद महाराजांनी आध्यात्मिक दृष्ट्या विराटला समजावलं.
प्रेमानंद महाराज म्हणाले, “जेव्हा देवाची तुमच्यावर कृपा असते म्हणजे फक्त वैभव मिळणंच नसतं. देवाची कृपा असणं याचा अर्थ म्हणजे तुमच्या मनातील भावना बदलणं. देवाचं नामस्मरण कर. कोणतीच काळजी करु नकोस”. विराट व अनुष्का प्रेमानंद महाराजांचं म्हणणं अगदी लक्ष देऊन ऐकत होते. हे सगळं ऐकत असताना दोघंही भावुक झाले. अनुष्का तर तिचं रडणं थांबवूच शकली नाही.
प्रेमानंद महाराजांच्या दर्शनाला जाताना अनुष्काने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तर विराट शर्ट व पँटमध्ये दिसला. यावेळी दोघंही महाराजांसमोर हात जोडून बसले होते. अनुष्का तर त्यांच्या भक्तीमध्ये मग्न झाली होती. देवाचं नामस्मरण करत होती. विराटला आता कुटुंबियांना अधिकाधिक वेळ द्यायचा आहे. खूप फिरायचं आहे. स्वतःला वेळ द्यायचा आहे. त्याचबरोबरीने हे सेलिब्रिटी कपल आत अध्यात्मिक मार्गाकडेरिटी कपल आता ता सेलिर््तीमध् का वळलं असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.