बुधवार, मे 14, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“गरीब पुढे गेलेला बॉलिवूडला बघवलं नाही”, इंडस्ट्रीत गोविंदाचा छळ झाल्याचा पत्नी सुनीताचा आरोप, बदनामी केली अन्…

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 13, 2025 | 1:10 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
actor Govinda wife blame Bollywood

“गरीब पुढे गेलेला बॉलिवूडला बघवलं नाही”, इंडस्ट्रीत गोविंदाचा छळ झाल्याचा पत्नी सुनीताचा आरोप

कलाकार त्यांच्या कामामधून प्रेक्षकांचं मन जिंकण्याचा सतत प्रयत्न करतात. एखादी भूमिका गाजली की, प्रसिद्धी म्हणजे नक्की काय? याचा प्रयत्यही कलावंतांना येतो. मेहनत करुन सिनेसृष्टीत स्टार झालेले कलाकार बऱ्याचदा काही काळासाठी पडद्यावर दिसतच नाहीत. त्यामागे काम न मिळणं, ब्रेक किंवा डिप्रेशन अशी अनेक कारणं असण्याची शक्यता असते. असाच एक कलाकार गेल्या काही वर्षांपासून रुपेरी पडद्यावर फारसा दिसलाच नाही. तो अभिनेता म्हणजे गोविंदा. गोविंदाने त्याच्या सुपरहिट चित्रपटांमधून बॉलिवूडचा एक काळ गाजवला. मात्र यादरम्यानच्या काळात त्याच्याबाबत अनेक नकारात्मक चर्चा झाल्या. याचबाबत आता गोविंदाची पत्नी सुनीता अहुजाने भाष्य केलं आहे. (actor Govinda wife blame Bollywood)

बॉलिवूडमध्ये कोणताच मध्यमवर्गीय अभिनेता टिकू शकत नाही असा दावा गोविंदाच्या पत्नीने केला आहे. इतकंच काय तर गोविंदाबरोबर राजकारण करण्यात आलं असंही तिचं म्हणणं आहे. ‘झुम’ला दिलेल्या मुलाखतीत सुनीता म्हणाली, “ते लोक गोविंदाबाबत अफवा पसरवायचे. तो सेटवर जायचा. लोक त्याच्या मागून खूप चर्चा करायचे. गोविंदाबरोबर राजकारण तर बरंच झालं”.

आणखी वाचा – Video : थांबायचं नाय गड्या; पवनदीपने रुग्णालयात गायलं गाणं, भीषण अपघातानंतर अशी आहे परिस्थिती, शस्त्रक्रिया झाल्यानंतर…

“गरीब व्यक्तीला मिळालेली प्रसिद्धी व यश कोणालाही बघवत नाही. त्याच्या बऱ्याच चित्रपटांचं प्रदर्शन थांबवण्यात आलं. पण असं का? हे सगळं करणारा एक सुपरस्टारच होता. मी कोणाचंही नाव घेऊ इच्छित नाही. पण इंडस्ट्रीमध्ये बरंच राजकारण आहे. गोविंदाचं इथे कोणीच गॉडफादर नव्हतं. तो विरारमधून एकटाच आला आणि स्टार झाला. तुमच्या नशिबात जर स्टार होणं असेल तर तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही हे मी माझ्या मुलांनाही सतत सांगते”.

आणखी वाचा – कार्तिकी गायकवाडच्या लेकाचा पहिला वाढदिवस, सुंदर फोटोशूट करत दाखवला चेहरा, नाव आहे…

पुढे सुनीता म्हणाली, “मुलांसाठी गोविंदा फिल्मइंडस्ट्रीमधील कोणालाही मदतीसाठी फोन करणार नाही. इंडस्ट्रीमधील कोणीच गोविंदाबरोबर उभं राहिलं नाही, त्याला मदत केली नाही. पण तो स्टार झाला”. गोविंदा सेटवर उशीरा येतो, विचित्र वागतो अशा अनेक चर्चा खूप काळ सुरु झाल्या. मात्र मुकेश खन्ना यांच्या एका शोमध्येही गोविंदाने याबाबत कबुली दिली होती. गोविंदा म्हणालेला, “मी सेटवर कधीच वेळेवर गेलो नाही. दिलीप कुमार यांना मी फॉलो करायचो. मी सेटवर जोपर्यंत सगळ्यांशी जुळवून घेत नाही तोपर्यंत मी तिथे जायचो नाही”. पण गोविंदाच्या पत्नीने त्याला योग्य ती वागणूक मिळाली नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

Tags: bollywood newsentertainment newsgovinda
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Ankita Walavalkar On Influencer
Entertainment

“फॉलोवर्सचा आकडा पाहून…”, सूरज चव्हाणचा ‘झापूक झुपुक’ न चालण्यावरुन कोकणहार्टेड गर्लचं भाष्य, म्हणाली, “त्याचे फॅन्स…”

मे 13, 2025 | 7:00 pm
abhijeet sawant on Marathi industry
Entertainment

“मराठी इंडस्ट्रीने कधी आपलसं केलंच नाही”, अभिजीत सावंतचा खुलासा, म्हणाला, “खूप दुखावलो…”

मे 13, 2025 | 6:22 pm
operation sindoor news
Entertainment

“गुटखा, जुगाराची जाहिरात करतात पण…”, कमांडो ऑफिसरचा बॉलिवूड सेलिब्रिटींना सवाल, ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा न देण्यावरुन…

मे 13, 2025 | 4:56 pm
Swiggy Delivery Boy Viral Video
Social

बाळंतपणात बायको गेली, संसार एकट्यावरच अन्…; लेकीला घेऊन स्विगी डिलिव्हरी करणारा ‘बाप’

मे 13, 2025 | 4:51 pm
Next Post
Bsf Women India Pakistan War

एक वर्षाचं मुल घरीच सोडून महिला सैनिक सीमेवर लढण्यास रवाना, सासूने घट्ट मिठी मारत दिला निरोप, डोळ्यांत पाणी आणणारा क्षण

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.