दिवंगत अभिनेते इरफान खान यांचा मुलगा बाबिल खान इंडस्ट्रीत स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करु पाहत आहे. मेहनत व चिकाटीने काम करत असताना बाबिल आता भलत्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याने रविवारी (४ मे) इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे रडत रडत एक व्हिडीओ शेअर केला. यामध्ये बाबिलने बॉलिवूड घाणेरडं असल्याचं म्हटलं. तो इथवरच थांबला नाही. अनन्या पांडे, अर्जुन कपूर, सिद्धांत चतुर्वेदी सारख्या कलाकारांचंही यामध्ये नाव घेतलं. काही मिनिटांमध्येच हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला. त्यानंतर वादाला तोंड फुटलं. बाबिलने लगेचच व्हिडीओ डिलिट करत इन्स्टाग्राम अकाऊंटच बंद केलं. आता पुन्हा त्याने इन्स्टाग्राम अकाऊंट सुरु केलं. (Irfan khan son babil khan controversy)
बाबिल खानचा युटर्न
बाबिलने रडत बॉलिवूडला चुकीचं ठरवलं. मात्र त्याचं व्हिडीओमधील वागणं पाहून तो नशेत असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. तर काहींनी त्याला बॉलिवूडसारख्या दलदलमध्ये न फसण्याचा सल्ला दिला आहे. बाबिलने पुन्हा इन्स्टाग्राम सुरु केलं. त्यानंतर त्याने काही पोस्ट शेअर केल्या. त्याने अनन्या पांडे, शनाया कपूर, अरिजीत सिंह, राघव जुयाल, अर्जुन कपूर, गौरव आदर्श सारख्या कलाकारांना टॅग करत त्यांचे आभार मानले. यामागचं कारण म्हणजे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या सगळ्यांनी त्याला पाठिंबा दिला होता.
आणखी वाचा – लग्नाच्या दोन वर्षांनी बाबा झाला दत्तू मोरे, घरी चिमुकल्याचं आगमन, पहिला फोटो समोर

बॉलिवूडमधील मित्रांचा पाठिंबा
बाबिल म्हणाला, “तुमच्या सगळ्यांचे आभार. हा व्हिडीओ खूप चुकीच्या अर्थाने घेतला गेला. अनन्या, शनाया, गौरव, अर्जुन व अरिजीत यांना मला पाठिंबाच द्यायचा होता. या सगळ्या गोष्टींसाठी लढण्याची माझ्याकडे आता ताकद नाही. पण मी ज्यांदा अधिक आदर करतो त्यांच्यासाठी बोलणं माझी जबाबदारी आहे”. डान्सर, अभिनेता राघव जुयालबाबत बाबिल म्हणाला, “तू माझा आदर्श आहेस. माझा मोठा भाऊ आहेस. मला मोठा भाऊच नव्हता. पण तू माझ्यासाठी ते स्थान आहेस”.
त्याचबरोबरीने सिद्धांत व गौरवबाबत बाबिल म्हणाला, “भाऊ धन्यवाद. गैरसमजांमध्येच अर्ध आयुष्य निघून जातं. पण खऱ्या मित्रांमुळे माझं मन नेहमीच शुद्द राहो हिच इच्छा”. बाबिलने त्याचे वडील व अभिनेते इरफान खान यांचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. हा व्हिडीओ म्हणजे इरफान यांच्याच चित्रपटामधील एक सीन आहे. ज्यामध्ये ते संवाद बोलताना रडत आहेत.
आणखी वाचा – “नऊवारी साडीवर केस मोकळे सोडून नाचणं ही कुठली लावणी?”, हिंदवी पाटीलचा इशारा नक्की कोणाकडे?, थेट म्हणाली…
नक्की प्रकरण काय?
बाबिल रडत म्हणालेला की, “मी तुम्हा सगळ्यांना एक सांगू इच्छितो की, शनाया कपूर, अनन्या पांडे, अर्जुन कपूर, सिद्धांत चतुर्वेदी, राघव जुयाल, गौरव, अरिजीत सिंहसारखे असे अनेक लोक आहेत. अजून अशी अनेक नावं आहेत. बॉलिवूड खूप घाणेरडं आहे. खूपच असभ्य आहे”. या व्हिडीओनंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली. बाबिलचे कुटुंबिय व त्याच्या टीमने माफी मागत एका पोस्ट शेअर केली. त्याच्या टीमने हे चित्रपटाचं प्रमोशन आहे असं म्हटलं. तर कुटुंबियांनी त्याला चुकीच्या पद्धतीने समोर आणलं असल्याचं म्हटलं आहे. आता हे प्रकरण आणखी पुढे जाणार की, बाबिलच्या कामावरही याचा परिणाम होणार हे पाहावं लागेल.