Viral Video : सोशल मीडियाचा वापर हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होताना पाहायला मिळतात. हे व्हिडीओ बरेचदा प्रेक्षकांचे मनोरंजन करतात तर काही वेळा आश्चर्याचा धक्काही देतात. सोशल मीडिया हे आता पैसा कमावण्याचे एक माध्यम झाल्यापासून यावर अनेक व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसतात. अशातच सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान धमाल करत आहे. कारण, हा व्हिडीओ केवळ मजेशीर नसून आश्चर्याचा धक्का देणारा आहे. या व्हिडीओमध्ये एक बैल रस्त्यालगतची स्कुटर घेऊन पळताना दिसत आहे. समोर आलेल्या व्हिडीओ पाहून अनेकांना हसू आवरेना झाले आहे. आणि नेटकरी या व्हिडीओवर गमतीशीर कमेंटही करताना दिसत आहेत.
आजवर आपण रस्त्यालगतच्या गाड्या चोरीला गेल्याच्या, वा आगीत जाळून खाक झाल्याच्या किंवा एखाद्या गाडीचा अपघात झाल्याच्या अनेक बातम्या ऐकत असतो. मात्र, रस्त्याच्या कडेला उभी केलेली गाडी चक्क बैलाने पळवून नेली ही गोष्ट न पचणारी आहे. पण हेच सत्य आहे. समोर आलेल्या एका व्हायरल व्हिडीओमध्ये असं पाहायला मिळत आहे की, रस्त्याच्या कडेला एक स्कुटर उभी आहे. आणि त्याच रस्त्यावरून वाहनांची आणि माणसांची ये-जा सुरु आहे. त्याचवेळी एक बैलही तेथून जाताना सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. मात्र पुढे त्या बैलाने जे केले ता पाहून हसू फुटले.
आणखी वाचा – एजाज खानचा शोमध्ये घाणेरडं कृत्य, कॅमेऱ्यासमोर कपडे काढायला सांगितले अन्…; एपिसोड प्रदर्शित झाल्यानंतर…
बैल त्या स्कुटरकडे जातो आणि स्कुटरवर चढून ती गाडी वेगाने रस्त्यावर चालवताना दिसत आहे. बैलाने ही केलेली कृती पाहून आजूबाजूच्या लोकांना धक्का बसला. समोरुन कोणते वाहन वा मनुष्य येत नसल्याने कोणताही अपघात झाला नाही. मात्र स्कुटरवर बसताच बैलाचा ताबा सुटला आणि तो मागच्या दोन पायांनी स्कुटर रस्त्यावर फिरवू लागला. सध्या हा व्हिडीओ पॉप किडा या इंस्टाग्राम अकाउंटवर तुफान व्हायरल होत आहे.
“दुचाकी चोरांना सोडून द्या. ऋषिकेश शहरात एक नवीन खेळाडू आला आहे आणि त्याला शिंगे आहेत. एका अरुंद गल्लीत पार्क केलेल्या स्कूटीवरून पळून जाण्याचा प्रयत्न करणारा एक भटका बैल व्हिडीओमध्ये कैद झाला आहे. त्या बैलाने दुचाकीला ढकलले आणि धक्का दिला जणू काही तो ही गाडी चालवत आहे. स्थानिकांचे म्हणणे आहे की हा बैल अनेकदा या भागात फिरतो आणि कदाचित तो परवाना नसलेला भारतातील पहिला देशी बाईकर असेल पण त्याच्या वागणुकीचा खूप मोठा फायदा आहे. हा व्हिडीओ आता सर्वत्र व्हायरल झाला आहे”, असं कॅप्शन देत या पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. “सगळ्यांच्या आपापल्या गरजा असतात, कदाचित त्याला एखाद्या गायीला इम्प्रेस करायचे असेल”, “त्याला ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही”, अशा अनेक गमतीशीर कमेंट नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत.