पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत देशभर तीव्र निषेध व्यक्त होत आहे. महाराष्ट्रसह देशभरातील काही कुटुंबानी आपल्या जवळच्या व्यक्तींना या हल्ल्यात गमावलं. हिंदू आहे की नाही? विचारत दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. फक्त धर्म हिंदू आहे म्हणून काहींना आपला जीव गमवावा लागला. पहलगाममध्ये गोळीबार सुरु असताना पर्यटकांनी व्हिडीओ शूट करत सोशल मीडियावर पोस्ट केले. यामध्ये धर्म हा एकमेव मुद्दा दिसला. आधार कार्ड तपासलं, उत्तर दिलं नाही म्हणून कपडेही काढण्यास दहशतवाद्यांनी मागे पुढे पाहिलं नाही. कलाक्षेत्रातील मंडळी याबाबत बोलत असताना ‘काश्मीर फाइल्स’ चित्रपटाची ही पुनरावृत्ती तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (pahalgam terror attack same as the kashmir files movie)
‘काश्मीर फाइल्स’ सारखंच घडलं
कलाकार मंडळींनी पहलगाम हल्ल्याबाबत पोस्ट शेअर करत हळहळ व्यक्त केली. दरम्यान अनुपम खेर यांनीही त्यांचं मत मांडलं होतं. यावेळी त्यांनी ‘काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचा उल्लेख केला होता. ‘काश्मीर फाइल्स’ आला तेव्हा हे सगळं खोटं असं सगळ्यांना वाटत होतं. आता त्यासारखंच थोडं फार घडलं आहे असं अनुपम यांनी पोस्टद्वारे म्हटलं होतं. ‘काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांनीही आता अशाचप्रकारे उल्लेख करत शोक व्यक्त केला.
काय म्हणाले विवेक अग्नीहोत्री?
विवेक यांनी पहलगाम हल्ल्याबाबत पोस्ट शेअर केली. ते म्हणाले, “२२ वर्षांपूर्वी नादिमर्गमध्ये हिंदूंना रांगेत उभं करत गोळी मारण्यात आली होती. आज पहलगाममध्ये पर्यटकांनाही गोळीबार करत मारण्यात आलं. तोच रक्तपात, तिच दरी आणि तिच शांतता. ‘काश्मीर फाइल्स’ हा फक्त चित्रपट नव्हता तर ही धोक्याची सुचना होती. या नरसंहाराकडे अजून किती काळ दुर्लक्ष करण्यात येणार आहे?”. पहलगाम हल्ला हा ‘काश्मीर फाइल्स’ची पुनरावृत्ती असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
‘काश्मीर फाइल्स’ चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा अनेक वादांना तोंड फुटलं होतं. काश्मीरी पंडितांवर झालेले अत्याचार, क्रुरता आणि त्यांच्या स्मीरी पंडितांवर झालेले अत्याचार थलांतराची कथा यामधून दाखवण्यात आली होती. ३०० कोटींपेक्षा अधिक कमाई या चित्रपटाने कमाई. कमाईचा मुद्दा एकीकडे पण चित्रपटाद्वारे दाखवण्यात आलेली कथा अंगाचा थरकाप उडवणारी होती. या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेल्या घटनांवर त्यावेळी अनेकांनी विश्वास ठेवण्यास नकार दिला होता. मात्र आता पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर परिस्थिती वेगळी पाहायला मिळत आहे.