धर्म, जात, रुढी-परंपरा याबाबत आजही खुलेपणाने बोलणं अनेकजण टाळतात. २१व्या शतकात आपण जगत असतानाही या सगळ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन अनेकांचा बदलेला दिसत नाही. एखाद्या व्यक्ती आपला धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारला की, त्याला डिवचलं जातं. असंच आता मराठी अभिनेत्री राजेश्वरी खरातबाबत घडत आहे. राजेश्वरीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केलेले फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. राजेश्वरीने ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचा मोठी निर्णय घेतला आहे. तिच्या आयुष्यातील हा महत्त्वाचा टप्पा आहे. राजेश्वरीने ख्रिश्चन धर्मात प्रवेश करतानाचे काही क्षण सगळ्यांबरोबर शेअर केले आहेत. (Actress Rajeshwari Kharat accepted christian religion)
राजेश्वरीने पांढऱ्या रंगाचे परिधान केले आहे. काही फोटोंमध्ये राजेश्वरी तिच्या जवळच्या मंडळींबरोबर दिसत आहे. तर एका फोटोमध्ये ती नदीमध्ये स्नान करताना दिसत आहे. स्नान करताना तिने हात जोडले आहेत. एका व्यक्त तिच्या डोक्यावर हात ठेवत राजेश्वरीला आशिर्वाद देत आहे. तिच्या या फोटोंवर अनेकांनी नकारात्मक कमेंट करत राजेश्वरीला ट्रोल केलं आहे.
आजपासून हिला कोणी डोक्यावर मिरवायचं नाही, ख्रिश्चन धर्म तुम्ही का स्वीकारला?, ज्या धर्मात तुम्ही जन्म घेतला त्याच धर्माचा तुम्हाला अभिमान पाहिजे, आता हिला अनफॉलो करणार अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. मात्र राजेश्वरीने या नकारात्मक चर्चांना उत्तर देणं टाळलं आहे. राजेश्वरीने Baptised म्हणत पोस्ट शेअर करत. तर दुसऱ्या एका पोस्टमध्ये नवी सुरुवात म्हणत तिने काही फोटो शेअर केले.
आणखी वाचा – “मुडदा परत आला, बायकांना…”, ‘देवमाणूस ३’च्या प्रोमोमध्ये सरु आजीच्या डायलॉगची हवा, डॉक्टरने घाबरवत…
राजेश्वरी नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फ्रँड्री’ चित्रपटामुळे नावारुपाला आली. तिची या चित्रपटातील शालू भूमिका प्रचंड गाजली. हा चित्रपट जातीभेदावर भाष्य करणारा होता. ‘फ्रँड्री’नंतर राजेश्वरीकडे फारसे चित्रपट आले नाहीत. मात्र सोशल मीडियाद्वारे ती बऱ्याचदा चर्चेत राहिली आहे. तिने काही गाणी, जाहिरात करत मनोरंजन क्षेत्रात काम सुरु ठेवलं.