मित्र-मैत्रीणी, कुटुंबाबरोबर एखाद्या ट्रीपला जाताना बरंच प्लॅनिंग आपण करतो. महाराष्ट्राबाहेर जात असताना तर अनेकजण देवभूमी पाहण्याची इच्छा व्यक्त करतात. देवभूमी म्हणजे उत्तराखंडमध्ये असणारी विविध ठिकाणं. खासकरुन ऋषिकेशला जाण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. गंगा आरती प्रत्यक्षात अनुभवायची हे ठरलेलंच. त्याचबरोबरीने ऋषिकेश म्हटलं की, रिव्हर राफ्टिंग करण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. रिव्हर राफ्टिंग करण्याचा मोह तर तरुणांना आवरत नाही. पण हाच मोह जीवावर बेतला तर… अशीच एक घटना आता एका तरुण मुलाबाबत घडली आहे. ऋषिकेश फिरायला गेलेल्या तरुणाने रिव्हर राफ्टिंगदरम्यान आपला जीव गमावला आहे. या घटनेदरम्यानचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (rishikesh river rafting accident viral video)
दुर्देवी अंत पण असं का?
बुधवारी (१६ एप्रिल) सकाळी सागर नेणी रिव्हर राफ्टिंगसाठी मित्र-मंडळींबरोबर ऋषिकेश येथील शिवपुरीला पोहोचला होता. रिव्हर राफ्टिंगला शिवपुरीपासून सुरुवात झाली. गरुड चट्टी पुलाजवळ जसे ते पोहोचले, तसे ती बोट पाण्याच्या अधिक प्रवाहामुळे पाण्यामध्ये पलटली. राफ्टमध्ये असणारी सगळीच मंडळी पाण्यामध्ये वाहत जात होते. पण राफ्टिंगसाठी गाइड करणाऱ्या व्यक्तीने अगदी हुशारीने पुन्हा एक एक व्यक्तीला बोटीमध्ये आणलं. पण सागरच्या नशिबी काही भलतंच होतं.
आणखी वाचा – “मम्मी, मम्मी…”, लेकीने डोळ्यांदेखत पाहिला आईचा मृत्यू, रील्सच्या नादात पोरकी झाली चिमुकली, Video व्हायरल
बेशुद्धच झाला अन्…
इतर पर्यटकांना गाइडने बोटमध्ये घेतलं. मात्र पाण्याचा प्रवाह व भितीने सागर बेशुद्ध झाला. त्याच अवस्थेमध्ये त्याला गंगा किनाऱ्यावर आणण्यात आलं. त्यानंतर त्याला सरकारी रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले. मात्र रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्याला मृत म्हणून घोषित केलं. या घटनेचा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. तो संपूर्ण थरार पाहून डोळ्यांत अगदी पाणी येतं.
आणखी वाचा – तरीही जिद्द कायम! ८९व्या वर्षी धर्मेंद्र यांची झालीय अशी अवस्था, चालणं कठीण तरीही व्यायम करुन…
पाहा व्हिडीओ
मुनिकीरेती पोलिस स्थानकाच्या म्हणण्यानुसार, त्याच्या शरीरामध्ये अधिक प्रमाणात पाणी गेलं. त्यामुळे तो बेशुद्ध झाला. दरम्यान सागरचा मृत्यू झाला. मात्र शवविच्छेदनाचा रिपोर्ट आल्यानंतर संपूर्ण प्रकार समोर येईलच. मात्र ही घटना घडल्यानंतर रिव्हर राफ्टिंग दरम्यानचा पर्यटकांचा सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ऋषिकेशमधील प्रशासनाने रिव्हर राफ्टिंगच्या सुरक्षिततेबाबात तसेच त्याचे नियम पाळण्याबाबत कठोर पाऊल उचलण्याची वेळ आली आहे असे अनेकांचे म्हणणे आहे.