‘दहावी अ’ वेबसीरिजचे कलाकार सध्या मुंबईमध्ये भटकंती करत आहेत. पहिल्यांदाच मुंबईत आल्यानंतर हे कलाकार अक्षरशः दंगा घालत आहेत. ITSMAJJA ची ही वेबसीरिज म्हणजे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणीच आहे. शूटमधून वेळ काढत ‘दहावी अ’ची मंडळी मुंबईत पोहोचली. त्यांनी विविध प्रेक्षणीय स्थळांना भेट दिली. दरम्यान मुंबईत पहिल्यांदा आल्यानंतर सिद्धीविनायकचे दर्शन घेतलं. त्यानंतर राणीची बाग, चैत्यभूमी, जुहू चौपाटी, Snow world अशा विविध ठिकाणी कलाकारांनी भटकंती केली. या स्वप्नाच्या नगरीत आल्यानंतर ‘दहावी अ’च्या मुलांची अनेक स्वप्न पूर्ण झाली आहेत. त्यातीलच एक स्वप्न म्हणजे ‘मुंबई इंडियन्स’ला जवळून पाहणं. (Mumbai Indians match)
१३ एप्रिलला मुंबई इंडियन्सचा सामना होता. दरम्यान ‘दहावी अ’ची टीम मुंबई इंडियन्सच्या लाइव्ह शोला उपस्थित होती. यावेळी स्टुडिओमध्ये त्यांच्या धमाल गप्पा रंगल्या. त्यांच्यासाठी हे सारं स्वप्नवत होतं. आता या कलाकारांचं आणखी एक स्वप्न पूर्ण होणार आहे. अथर्व, संयोगिता, सृष्टी, रुद्र, ओम, सत्यजीत, श्रेयस आज मुंबई इंडिन्सच्या सामन्यासाठी वानखेडे स्टेडियममध्ये हजेरी लावणार आहेत. या सगळ्या कलाकारांसाठी ही सुवर्णसंधीच आहे.
आणखी वाचा – ‘दहावी अ’च्या कलाकारांचं मोठं स्वप्न पूर्ण, गुगल ऑफिसची सफर अन् बरंच काही
वानखेडे स्टेडियममध्ये हे कलाकार पहिल्यांदाच जाणार आहेत. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सच्या संपूर्ण टीमला जवळून पाहणार आहेत. कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे मॅचच्या तिकिटचे फोटो शेअर केले. वानखेडे स्टेडियमला ७.३० वाजता ‘दहावी अ’च्या टीमला तुम्ही भेटू शकता. याआधीही मुंबई इंडियन्सच्या लाइव्ह शोमध्ये कलाकारांनी एकच जल्लोष केला होता. आता ‘दहावी अ’ची लोकप्रियता पाहिल्यानंतर मुंबई इंडियन्सकडून सामन्यासाठी कलाकारांना बोलावण्यात आलं आहे.
आणखी वाचा – ‘दहावी अ’च्या कलाकारांची जीवाची मुंबई, Snow World मध्ये मस्ती ते जुहू बीचवर खाण्यासाठी मारला ताव
मुंबई इंडियन्सच्या भेटीबरोबरच ‘दहावी अ’च्या कलाकारांचं आणखी एक स्वप्न पूर्ण झालं. त्यांनी गुगल ऑफिसची सफर केली. युट्युबकडून या सगळ्या कलाकारांना आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी गुगल ऑफिसमध्ये ‘दहावी अ’च्या टीमसह धमाल गप्पा रंगल्या. या कलाकारांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळत आहे. आता आज ७.३० वाजता ‘दहावी अ’ची काय दंगा घालणार?, कलाकारांना क्रिकेटर्सला भेटायला मिळणार का?, आणखी काय काय सरप्राइज असणार? हे पाहणं रंजक ठरणार आहे.