वेबसीरिजच्या माध्यमातून अनेक दर्जेदार कथा उत्तम पद्धतीने प्रेक्षकांसमोर येत आहेत. प्रेक्षकही अगदी आवर्जुन कलेला दाद देतात. असाच एक दमदार विषय घेऊन ITSMAJJA ची ‘आठवी अ’ वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. या वेबसीरिजने प्रेक्षकांना अगदी वेड लावलं. ‘आठवी अ’च्या प्रत्येक भागाने मिलियनचा टप्पा गाठला. प्रेक्षकांनी या सीरिजच्या पुढच्या भागांची मागणी केली. त्यातूनच ‘दहावी अ’ची सुरुवात झाली. ‘दहावी अ’ वेबसीरिज सध्या प्रेक्षकांमध्ये तुफान गाजत आहे. या वेबसीरिजला चाहते भरभरुन प्रेम देत आहेत. या सीरिजच्याही भागांना एका दिवसांतच मिलियन व्ह्युज मिळत आहेत. याच सीरिजमधील मंडळी सध्या मुंबई सफर करत आहेत. (dahavi a webseries actors Mumbai trip)
दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुंबई इंडियन्स सामन्याच्या लाइव्ह शोमध्ये ‘दहावी अ’च्या कलाकारांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. आता ही सगळी मुलं १७ एप्रिलला वानखेडे स्टेडियमध्ये होणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या सामन्यासाठी हजेरी लावणार आहेत. त्याचदरम्यान कलाकारांचा मुंबई दौरा सुरुच आहे. मुंबईतील विविध ठिकाणांना ‘दहावी अ’चे कलाकार भेट देत आहेत. पहिल्यांदाच मुंबईतील प्रेक्षणीय स्थळांना पाहिल्यानंतर ‘दहावी अ’चे कलाकार भारावून गेले आहेत.
आणखी वाचा – बाळाला जन्म दिल्यानंतरची स्त्री कोणाला कळलीच नाही, सावरलं तिने स्वतःला पण…
संयोगिता, सृष्टी, अथर्व, ओम, श्रेयस, सत्यजीत, रुद्र, विनित मुंबईच्या Snow world मध्ये गेले होते. यावेळी त्यांनी बरीच धमाल-मस्ती केली. एकमेकांवर बर्फ फेकत आनंद लुटला. विविध प्रकारचे खेळ खेळले. त्यांच्यासाठी हा अनुभव अगदी अविस्मरणीय होता. यावेळी ओम, संयोगिताचा आनंद गगनात मावेनासा झाला. Snow world मध्ये कलाकारांना नवं काहीतरी अनुभवायला मिळालं. त्यानंतर ‘दहावी अ’चे कलाकार थेट जुहू येथील इस्कॉन मंदिरात गेले. तिथे त्यांनी दर्शन घेतलं. मंदिराची रचना पाहून सारेच भारावून गेले. मंदिराचा परिसर आपल्या चाहत्यांना दाखवला.
मुंबईमध्ये पहिल्यांदा आले आणि चौपाटीवर न जाणं शक्यच नाही. मग काय ‘दहावी अ’ची स्वारी थेट जुहू चौपाटीवर गेली. यावेळी मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. चौपाटीवर धमाल-मस्ती केल्यानंतर कलाकारांनी खाण्यावर ताव मारला. बर्फाचा गोळा खाण्यासाठी गर्दी केली. तर कोणी फालुदा खातो म्हणत आनंद लुटला. ‘दहावी अ’च्या कलाकारांनी त्यांच्या जीवाची मुंबई केली हे नक्की.