Farah Khan Cook Dilip : फराह खान सध्या त्यांच्या स्वयंपाक घरातील गमतीशीर व्हिडीओंमुळे चर्चेत असतात. त्या कलाकारांसह त्यांच्या स्वयंपाक घरात जेवण बनवताना दिसतात. त्यांचे हे स्वयंपाक घरातील व्हिडीओ चर्चेत असतातच पण यांत अधिक चर्चेचा विषय ठरतो तो म्हणजे दिलीप. हो. फराह खान यांचे हे व्हिडीओ व्हायरल होण्यामागचं मुख्य कारण म्हणजे त्यांचा कुक दिलीप. गेल्या दहा महिन्यांपासून फराह खान यांचे स्वयंपाकाचे व्हिडीओ केवळ व्हायरल झाले नाहीत तर कुक दिलीप देखील प्रसिद्ध झाला आहे. बऱ्याच व्हिडीओमध्ये फराह खान आणि त्यांच्या कुकची मजेदार संवाद लक्षवेधी ठरतात. त्यांचे हे खास बॉण्डिंग उपस्थित कलाकारांसह प्रेक्षकांच्याही पसंतीस पडते. दिलीप उत्तम कुक असून तो नेहमीच त्याच्या हातच्या चवीने साऱ्यांचं मन जिंकतो.
अलीकडेच फराहने आपला व्हीलॉग शेअर केला, ज्यामध्ये तिचा कुक दिलिप पगार वाढवण्यास सांगताना दिसत होता. यावर, फराहने दिलीपच्या पगाराबाबत थेट व्हिडीओमध्ये हिंट दिली. फराह खानने त्याच्या नवीनतम व्हीलॉग शेफ विकास खन्ना यांच्या स्टुडिओ किचनमध्ये शूट केला. या भागासाठी तिने अभिनेता सनी सिंग यांना आमंत्रित केले. जेव्हा व्हिडीओ सुरु होता, तेव्हा फराह आणि तिचा कुक दिलीप यांच्यातील संवाद ऐकून खूप मजा आली. यानंतर, जेव्हा फराह स्वयंपाकघरात आली तेव्हा तिच्या कुकने स्वयंपाकघरात एसी नसल्याने टोमणे मारले.
आणखी वाचा – “आई खूपच काय काय करते” म्हणत मधुराणी प्रभुलकरचे संस्कार काढणारे तुम्ही कोण?
यानंतर, अभिनेता सनी सिंग, स्वयंपाकघरात प्रवेश करताच, थेट विचारतो. “तुमच्याकडे अडीच किलोचा हात नाही का?”, हे ऐकून, फराह दिलीपला म्हणते, “तुला लाज वाटली नाही का?”. यानंतर, सनी सिंगने आपल्या चित्रपटांची नावे आठवण करुन देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला काहीच आठवत नाही. यानंतर, सनी सिंगने तिच्या कुकच्या मदतीने पनीर बुर्जी आणि लस्सी बनवली. आणि तिघांनीही त्याचा आस्वाद घेतला. शेवटी सनी सिंह दिलीपला पंजाबी भाषा शिकवतो आणि त्याचा पगार विचारतो. यावर, दिलीप फराह खानकडे आपला पगार वाढवण्याची मागणी करतो.
ज्यावर फराह सनीला म्हणते, ‘जर मी तुला याचा पगार सांगितला ना तर रोहित तुला सोडून माझ्याकडे येईल”.
त्याच वेळी, फराह खानने आणखी एका व्हीलॉगमध्ये सांगितले होते की, गावात सहा बेडरूम असलेला तीन मजली बंगला आणि वैयक्तिक तलाव आणि शेतजमीनही आहे.