Ranveer Allahbadia Shared New Podcast : युट्युबर रणवीर अलाहबादियाने ३१ मार्च २०२५ रोजी त्याच्या युट्युब चॅनेलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात, तो बौद्ध भिक्षू पालागा रिनपोचे यांची मुलाखत घेताना दिसत आहे. ‘इंडिया गॉट लेटेन्ट’ या शोमधील वादानंतरचा हा त्याचा पहिला व्हिडीओ आहे. चाहत्यांनी त्याच्या पुनरागमनाचे जोरदार स्वागत केले आहे. रणवीर अलाहबादियाच्या युट्युब चॅनेलचे १०.४ दशलक्ष प्रेक्षक आहेत. वादाच्या भोवऱ्यातून आता बाहेर पडत रणवीरने मोठं पाऊल उचललं आहे. पुन्हा एकदा नव्या जोमाने त्याने त्याचा पॉडकास्ट सुरु केला आहे आणि समोर आलेल्या आव्हानांना ओलांडत यशाच्या दिशेने प्रवास सुरु केला आहे. रणवीर अलाहबादीयाच्या समोर आलेल्या पहिल्या पॉडकास्टच्या बातमीने त्याच्या चाहत्यांमध्येही आनंदाचं वातावरण पसरलेलं पाहायला मिळत आहे.
रणवीरने त्याच्या पहिल्या मुलाखतीचा व्हिडीओ शेअर केला आणि या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “पहिले नवीन पॉडकास्ट येत आहे – बौद्ध भिक्षूशी हार्ट -टू -हार्ट संभाषण. पालागा रिनपोचे”. ‘इंडिया गॉट लेटेन्ट’ शोवरील आक्षेपार्ह टिप्पणीबद्दल वादग्रस्त असलेल्या रणवीरने सुमारे एका महिन्यानंतर त्याचे पॉडकास्ट जाहीर केले आहे, ज्यात त्याने आपल्या जीवनातील आव्हानात्मक वास्तवाचा उल्लेखही केला आहे. पॉडकास्टमध्ये, रणवीरने त्यांच्याबरोबरची ही बैठक लक्षात ठेवण्यासारखी आहे कारण त्यांनी त्याला ज्ञान आणि करुणेचे एकत्रीकरण करण्याचा खरा अर्थ शिकविला. याबाबत त्याने बौद्ध भिक्षूबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
आणखी वाचा – आवाजासाठी प्यायली स्पर्मपासून बनवलेले कॉकटेल आणि…; अमेरिकन गायिकेचा धक्कादायक खुलासा, किळसवाणा प्रकार
पालागा रिनपोचे म्हणतात, “बर्याच वर्षांपासून केलेल्या कामाबद्दल मी कृतज्ञ आहे, ज्यामुळे या व्यासपीठावर लाखो लोकांना फायदा झाला आहे. बर्याच ज्ञानी लोकांनी आपले कौशल्य इतरांसह इंटरनेट, युट्युब, अॅप्स आणि स्पॉटफिटद्वारे शेअर केले आहे. मी नेहमीच प्रार्थना करीन की आपण हे महान कार्य करत रहावे, केवळ शिक्षणच नव्हे तर लोकांना प्रेरणा देईल. तसेच, ज्ञान पसरवत रहा. आजकाल लोकांना बरेच ज्ञान आहे, परंतु त्यांच्याकडे प्रेरणा नसते. या संदर्भात आपले व्यासपीठ खूप उपयुक्त आहे. हे चांगले काम सुरु ठेवण्याची मी विनंती करतो”.
रणवीर म्हणाला, “सर, माझ्या आयुष्यात आपण दोनदा भेटलो आहोत आणि जेव्हा मला अडचणींचा सामना करावा लागत होता अशा वेळी तुम्ही नेहमीच आलात. जेव्हा माझ्या वास्तविकतेला एखाद्या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो तेव्हा तुम्ही सोबत असता. आज माझ्यासमोर एक मोठे आव्हान आहे, ज्याबद्दल मला कधीच वाटले नाही की मला या आव्हानाला कधी सामोरे जावे लागेल. म्हणून मी खूप कृतज्ञ आहे. धन्यवाद, तुमची भेट मला आवडली”. रणवीर समय रैनाच्या शोमध्ये अतिथी म्हणून दाखल झाला. त्याने स्पर्धकांना पालकांबद्दल अश्लील प्रश्न विचारला, ज्याने एक गोंधळ उडाला. आणि हे प्रकरण चिघळले. रणवीरनेही दोनदा दिलगिरी व्यक्त केली.