शनिवार, मे 10, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बाईच बाईला जिवंतपणे मारते हे ‘तू’ सिद्ध केलंस…

काजल डांगेby काजल डांगे
मार्च 21, 2025 | 2:22 pm
in Women
Reading Time: 1 min read
google-news
know about women problems

know about women problems

गेला माझा पोरगा… माझी नजर शोधते अजूनही त्याला… काय गं माझी पोरगीही अशीच मला फसवून गेली ना तीन वर्षांपूर्वी. आता हा गेला. राहिलं काय माझ्या पदरात… मध्यरात्री आम्हा नवरा-बायकोला काय झालं कोणाला हाक मारु?… काय करु गं काय करु… जोरजोरात हंबरडा फोडून रडणाऱ्या त्या आईची अवस्था पाहून माझ्या संपूर्ण अंगाला घाम फुटला. माझ्याही डोळ्यांमध्ये अश्रूंच्या धारा लागल्या. मी हे सगळं बोलतेय ते माझी मैत्रीण रेखाच्या आईबद्दल… तीन वर्षांपूर्वी रेखा आजारपणात कायमची देवाघरी निघून गेली. वय होतं फक्त २५… पाठी राहिले ते तिचे आई-वडील आणि भाऊ. आता कुठे तिचं जाणं थोडंफार कुटुंबाला पचलं होतं… पण खेळ शेवटी नशिबाचा. काही दिवसांपूर्वीच रेखाचा भाऊ आजारी पडला. जवळच्या रुग्णालयात नेलं आणि अवघ्या चौथ्या दिवशीच तो घरी आला तो कायमचा झोपलेलाच… दोन्ही भावंडांचा तीन वर्षांच्या फरकामध्ये खेळ संपला आणि तेही अवघ्या विशीत… नशिबाने असा काही युटर्न घेतला की, पुन्हा ते कुटुंब शुन्यामध्ये येऊन पडलं. (womens problem)

रेखा गेल्यानंतर दोन वर्षांनी मी तिच्या घरात पाऊल ठेवलं. तिच्या आईला भेटायचं धाडस केलं. जाताना मनात हजार प्रश्न, कंठ दाटून आला, मी मोठा आवंढा गिळला… स्वतःला आधी सावरलं आणि मगच रेखाच्या घरात गेले. त्यांना भेटायला आलेली काही मंडळी आधीच घरात बसली होती. मी कसंबसं आतमध्ये गेले आणि वाट काढून उभी राहिले. तोच रेखाच्या आईने एक नजर माझ्याकडे टाकली… आणि वरती जसं मी सांगतिलं तसं तिने एकच मोठा हंबरडा फोडला. मी एकाच जागी स्तब्ध उभी होते. तोपर्यंत तिच्याजवळ आधीपासून बसलेली मंडळी आपापल्या परीने समजूत काढत होते. समजूत काढणाऱ्यांमध्ये बसलेल्या सगळ्या स्त्रियाच होत्या. बहुदा माझ्यासारखंच त्या कुटुंबाशी त्या स्त्रियांचं नातं जोडलं गेलेलं असावं…

आणखी वाचा – महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचं वाढतं प्रमाण, पण असं नक्की का घडतंय?, ‘या’ पाच लक्षणांमुळे…

१५ ते २० मिनिटं मी कधी रेखाच्या आईकडे तर कधी तिथे बसलेल्या स्त्रियांकडे बघत होते. त्यांचं बोलणं शांतपणे ऐकत होते. माझी लेक गेली तिही मंगळवारची सकाळच होती आणि आता माझा मुलगा गेला तोही मंगळवारीच… रेखाची आई भावनेच्या ओघात रडत रडत बोलून गेली… बस्स समजूत काढायला आलेल्या बायकांनी तोच विषय उचलून धरला. एक म्हणे हो ताई मंगळवार वारच खराब ना… हा दिवस उलटून गेला असता तर एकवेळ तुमचा मुलगा वाचला असता. पण काय बोलतात ना पोराचं नशिबंच खोटं… त्या बाईला कुठे थांबावं याचं भानच उरलं नव्हतं अन् फडाफडा बोलत राहिली.

एक बोलायची थांबते नाही तोपर्यंत दुसरीने तिच्या तोंडाचा पट्टा सुरु केला. अहो तो आजारी होता हे सांगायचं तरी… का लपवून ठेवलं? आम्ही आमच्या आमच्या परीने केली असती की धडपड… रेखाची आई जोरातच रडत ओरडली… अहो माझा पोर आजारीच नव्हता… साधा ताप म्हणून घेऊन गेलो हॉस्पिटलला त्यात तुम्हा सगळ्यांना कुठे त्रास आणि सांगणार… तरीही ती बाई काही बोलायची थांबेना… तरीही ओ काहीतरी झालं असतं अजून आपण चांगल्या हॉस्पिटलला नेलं असतं. वाचला असता ना ओ पोर… बिचारी रेखाची आई ते ऐकून स्वतःच्याच नशिबाला दोष देत डोक्यावर हात आपटत राहिली. बसलेल्या इतर बायकाही तिच्या बोलण्यावर मान डुलवत सहमती दर्शवत होत्या.

आणखी वाचा – अंतराळात मूत्रविर्सजन, टॉयलेटचा वापर कसा करतात?, मासिक पाळी आल्यास काय करतात?, सुनीता विल्यम्सने दाखवला Video

काही मिनिटंच तिथलं चित्र पाहिलं आणि माणसांच्या रुपात बसलेल्या राक्षसांचं मला दर्शन घडलं. दोन तरुण मुलं गमावणाऱ्या आईचं दुःख, भावना स्त्रियांनीच समजू नये छे… बाई बाईलाच जिवंतपणे मारते हे त्या प्रसंगी सिद्ध झालं. एरव्ही आम्ही किती समजूतदार म्हणत झेंडा मिरवणाऱ्या या बायकांचा शहाणपणा अशावेळी कुठे जातो?. आपल्या बोलण्यामुळे समोरच्याने स्वतःच्या जीवाचं काय बरं वाईट केलं तर? हीही विचार तुम्हाला येत नाही का?. उद्या हेच चित्र दुर्देवाने तुमच्या नशिबी घडलं तर काय होईल? या विचाराने तरी तुमचं तोंड तुम्ही शिवत का नाही?. कसलीच भीती, आपुलकी, समजूतदारपणा तुमच्यासारख्या स्त्रियांमध्ये राहिला नाही का हो?. अशा तमाम स्त्री वर्गाला एकच विनंती एकमेकींचं दुःख समजून घ्या… अन्यथा बाई बाईलाच जिवंतपणे मारते हे वेळोवेळी सिद्ध होईल आणि दुर्देवाने तुम्हालाही रेखाच्या आईसारखा अनुभव आला तर जगणं कठीण होऊन जाईल एवढंच… बघा विचार करा आणि तुम्हालाही या प्रसंगाबद्दल काय वाटतं? याविषयी कमेंटद्वारे व्यक्त व्हा… कारण आम्ही तुम्ही बोललो तर चांगला समाज घडण्यास मदत होईल इतकंच…

Tags: trending newswomen problemswomen rights
काजल डांगे

काजल डांगे

काजल डांगे या 'इट्स मज्जा' वेबसाईटच्या सीनिअर एडिटर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. महर्षी दयानंद महाविद्यालयामधून त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (बीएमएम) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना साम टीव्ही, प्रहार वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. त्यानंतर त्यांनी ‘न्यूज १८ लोकमत’ या वृत्तवाहिनीपासून पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त वाहिनीमध्ये दोन वर्षांचा अनुभव. त्यानंतर त्यांनी ‘सकाळ’ वृत्तपत्रामध्ये दोन वर्ष सब एडिटर म्हणून जबाबदारी हाताळली. शिवाय ‘सकाळ’ वृत्तपत्राच्या प्रीमियर या मासिकाच्याही त्या सब एडिटर होत्या. 'लोकसत्ता' ऑनलाईनमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून त्या दीड वर्ष कार्यरत होत्या. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Akshay Kelkar Wedding
Entertainment

शुभमंगल सावधान! ‘बिग बॉस’ फेम सुप्रसिद्ध अभिनेता अडकला लग्नबंधनात, लग्नातील पहिला फोटो समोर

मे 9, 2025 | 6:08 pm
Aly Goni Viral Post
Entertainment

“जम्मूमध्ये माझं कुटुंब हल्ले सहन करतायत”, भारत-पाकमधील वाढत्या तणावामुळे प्रसिद्ध अभिनेता काळजीत, सांगितली सत्य परिस्थिती…

मे 9, 2025 | 5:35 pm
Pakistani Person Viral Video
Social

“त्यांना न्याय मिळाला”, पाकिस्तानी नागरिकाकडून भारतीय सैन्याचे कौतुक, पाक सैन्याला खडेबोल सुनावत…

मे 9, 2025 | 4:08 pm
Neha Kakkar Attends Driver Wedding 
Entertainment

नेहा कक्करची ड्रायव्हरच्या लग्नात उपस्थिती, नवरी मुलगी नमस्कार करण्यास खाली वाकताच घेतलं जवळ, गायिकेच्या कृतीने जिंकलं मन

मे 9, 2025 | 1:03 pm
Next Post
डोळ्यांच्या रंगांवरुन समोरच्या व्यक्तीला ओळखता येतं का?, दडलेलं आहे आयुष्यातील अनेक रहस्य

डोळ्यांच्या रंगांवरुन समोरच्या व्यक्तीला ओळखता येतं का?, दडलेलं आहे आयुष्यातील अनेक रहस्य

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.