Shriya pilgonkar On Nepotism: एव्हरग्रीन आणि देखण्या अभिनेत्यांच्या यादीतील एक महत्वाचं नाव म्हणजे अभिनेते सचिन पिळगावकर. सिनेसृष्टीतील अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून सचिन यांच्या कडे पाहिलं जात. अनेक काळ प्रेक्षकांचं सातत्याने मनोरंजन करण्यात सचिन कायमच यशस्वी ठरले आहेत. (Shriya pilgonkar On Nepotism)
आता वडिलांचा अभिनयक्षेत्रातील हा वारसा सचिन पिळगावकर यांची लेक अभिनेत्री श्रिया पिळगावकर योग्य रीतीने पुढे चालवण्याचा सार्थ प्रयत्न करताना दिसते आहे.’एकुलती एक’ या मराठी चित्रपटामधून श्रियाने सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केले.त्यानंतर अभिनेता शाहरुख खानच्या ‘फॅन’ या चित्रपटात श्रिया झळकली.’मिर्झापूर’ ‘गिल्टी माईंड’ ‘ताजा खबर’ यांसारख्या अनेक सिरीज मधून श्रियाने तिच्या अभिनयाची छाप पाडली. आज श्रेया ओटीटी स्टार म्हणून ओळखली जाते.
पाहा काय म्हणाली श्रिया? (Shriya pilgonkar On Nepotism)
परंतु जेव्हा तुम्ही एका कलाकारच पाल्य असता आपल्याच आई वडिलांच्या माध्यमातून सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करता तेव्हा घराणेशाही हा मुद्दा जोर धरू लागतो. अशातच श्रिया एका मुलाखतीत घराणेशाहीच्या लेबल बदल स्पष्टच बोलली. श्रिया म्हणाली माझ्याबाबतीत ‘घराणेशाही’ हा शब्द नकारात्मकतेनं वापरला गेला नाही. ती ‘फ्रीडम टू लव्ह’ हे नाटक करत होती. त्या नाटकाची तालीम करताना आई-पप्पा तिला पाहत . तेव्हा ती आता अभिनय क्षेत्रात उतरली आहे, अशी अधिकृत घोषणा वगैरे केली नव्हती. तिने सहज म्हणून नाटकात काम करायला सुरुवात केली. ते नाटक पाहिल्यानंतर सचिन तिला म्हणाले, ‘मला तुझं काम आवडलंय. मी सध्या वडील-मुलीच्या नात्यावर भाष्य करणाऱ्या कथेवर काम करतोय. त्यात तू काम करावंस अशी माझी इच्छा आहे. तुला संहिता आवडली तर आपण एकत्र काम करू’.

तिने जर चित्रपट स्वीकारला तर लोक तिच्या बदल काय बोलणार हे तिला माहित होत परंतु तिने काहीही केलं असत तरी लोक बोलणारच होती. तेव्हा सचिन तिला म्हणाले मी माझ्या करिअरप्रवासात अनेक लोकांना संधी दिली आहे मग तुला का देणार नाही? पण ते पुढं कस घेऊन जायचं ते तुझ्या हातात आहे.माझ्या मुळे तुला पहिली संधी मिळेल दुसरी संधी मिळेल पण खरंच तुझ्यात त्या क्षमता असतील तरच तू या क्षेत्रात नाव करू शकशील.श्रिया म्हणते मी मात्र माझा प्रवास टप्प्याटप्प्यानंच केलाय. मी आई-पप्पांच्या ओळखीचा फायदा वा घराणेशाहीचं कार्ड कधीच वापरलं नाही. त्यामुळे माझ्यापर्यंत त्या शब्दाची नकारात्मकता पोहोचत नाही.
हे देखील वाचा : मोठा पडदा गाजवायला फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरे सज्ज, ‘अंकुश’ चित्रपटात साकारणार महत्वपूर्ण भूमिका